Coronavirus : पद्मश्री पुरस्काराने सन्मानित असलेल्या व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू

वृत्तसंस्था
Thursday, 2 April 2020

भारत सरकारने पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेल्या आणि सुवर्ण मंदिरात हजुरी रागी काम केलेल्या पंजबामधील निर्मला सिंग खालसा यांचा कोरोनानं मृत्यू झाला आहे. पंजाब सरकारच्या आरोग्य विभागानं ही माहिती दिली आहे.

अमृतसर : भारत सरकारने पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेल्या आणि सुवर्ण मंदिरात हजुरी रागी काम केलेल्या पंजबामधील निर्मला सिंग खालसा यांचा कोरोनानं मृत्यू झाला आहे. पंजाब सरकारच्या आरोग्य विभागानं ही माहिती दिली आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अमृतसरमधील जीसीएमएच रुग्णालयात निर्मला सिंग खालसा यांना दाखल करण्यात आलं होतं. कोरोना झाल्याचं निदान झाल्यानंतर त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सुवर्ण मंदिरात माजी हजुरी रागी आणि पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलेल्या ६२ वर्षीय निर्मला सिंग खालसा यांना त्रास होत असल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अमृतसरमधील जीसीएमएच रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. करोनासदृश्य लक्षणं दिसून आल्यानं तपासणी करण्यात आली. चाचणी रिपोर्ट आल्यानंतर कोरोना असल्याचं निष्पन्न झालं होतं.

Coronavirus : महायुद्धानंतर पहिल्यांदाच विम्बल्डन स्पर्धा रद्द

दरम्यान, अस्थमाचा त्रास असल्यानं या व्यक्तीच्या जिवास धोका असल्याची भीती डॉक्टरांनी व्यक्त केली होती. प्रकृती ढासळल्यानं त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. बुधवारी कोरोना झाल्याचं निदान झाल्यानंतर आज (ता.०२) गुरूवारी या व्यक्तीचा मृत्यू झाला. पंजाबच्या आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांकडून ही माहिती देण्यात आली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Padma Shri awardee dies of coronavirus in Amritsar