Coronavirus : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी तरुणांना केलंय आवाहन; म्हणाले...

वृत्तसंस्था
शनिवार, 21 मार्च 2020

- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात जनता कर्फ्यूची केली घोषणा. 

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. भारतातही रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. सध्या भारतात कोरोनाचे 250 पेक्षा अधिक रुग्ण सापडले आहेत. फक्त एकाच दिवसात विविध राज्यांमध्ये 35 नवीन रुग्ण सापडले आहेत.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात जनता कर्फ्यूची घोषणा केली आहे. त्यानंतर आता सोशल मीडियाच्या माध्यमातून देशवासियांना आवाहन करत आहेत. त्यांनी तरुणांना कोरोनाला रोखण्यासाठी करता येणाऱ्या उपाययोजना शेअर करण्यास सांगितले आहे. तसेच पुढचे पाऊल म्हणून त्यांनी देशवासियांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करताना कंपन्यांनाही कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची मुभा देण्याचे आवाहन केले आहे.

व्हिडिओ केला शेअर

मोदींनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी कोरोनाचा प्रसार होण्यासाठी कोणती बाब कारणीभूत आहे, हे सांगितले आहे.

Coronavirus: गायिका कनिका कपूरविरोधात गुन्हा दाखल 

#IndiaFightsCorona वर व्हिडिओ करा पोस्ट

कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी आणि लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी तुमचे काही व्हिडिओ असतील तर #IndiaFightsCorona या हॅशटॅगवर पोस्ट करावेत, असे आवाहनही पंतप्रधान मोदींनी केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PM Narendra Modi Appeal to Youth on Coronavirus Issue