Coronavirus : पंतप्रधान मोदींनी लॉकडाऊनबाबत घेतला महत्त्वपूर्ण निर्णय; आता...

टीम ई-सकाळ
Tuesday, 14 April 2020

महाराष्ट्रात यापूर्वीच लॉकडाऊनच्या मुदतीत वाढ

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाला संबोधित केले. यावेळी त्यांनी कोरोना पार्श्वभूमीवर विविध मुद्द्यांवर भाष्य केले. पंतप्रधान मोदी म्हणाले, लॉकडाऊनमध्ये सर्वांनी सहकार्य केले. नियमांचे पालन केले. घरात बसून सण साजरा करत आहेत. या सर्व गोष्टी प्रशंसा करण्यासारख्याच आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पंतप्रधान मोदी म्हणाले, जेव्हा आपल्याकडे एकही प्रकरण नव्हते तेव्हा भारताने विमानतळावर प्रवाशांची चौकशी केली होती. १४ दिवसांचे विलगीकरण केले होते. ५५० प्रकरणं होतं. २१ दिवसांचे लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला होता. जशी समस्या दिसली लगेच त्याचवेळी ती रोखण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. सोशल डिस्टन्सिंगचा यामुळे फायदा झाला आहे.

दरम्यान, देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढण्याचे प्रमाण कायम असून, आजअखेर सरकारी आकडेवारीनुसार ९००० पेक्षा अधिक कोरोनाग्रस्त देशात आहेत आणि मृत्यू पावलेल्यांची संख्या ३०० हून अधिक झाली आहे. 

3 मेपर्यंत राहणार लॉकडाऊन

प्रत्येक राज्यांकडून लॉकडाऊन वाढविण्याची मागणी केली जात होती. त्यामुळे आता देशभरात ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढविण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे.

तुलनेने भारतात कमी रुग्ण

यापूर्वी कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या इतर देशांच्या तुलनेत काहीच फरक नव्हता. मात्र, आता भारताने वेळीच निर्णय घेतल्याने परिस्थिती काही प्रमाणात स्थिर आहे. 

सरकारकडून मार्गदर्शक सूचना लवकरच

देशातील नागरिकांसाठी लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून मार्गदर्शक सूचना लवकरच जारी केल्या जातील, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

महाराष्ट्रात यापूर्वीच लॉकडाऊनच्या मुदतीत वाढ

महाराष्ट्रासह देशातील सात राज्यांनी लॉकडाउनची मुदत ३० एप्रिलपर्यंत वाढवली आहे. पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे केलेल्या चर्चेतही अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी लॉकडाउन वाढविण्याची मागणी केली होती. दिल्ली, पंजाब, पश्चिम बंगाल, ओडीशा आणि तमिळनाडूसह सात बिगर भाजपशासित राज्यांनी हा निर्णय आधीच देऊन टाकला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PM Narendra Modi Extends Lock Down till 3 May 2020