Coronavirus : #9pm9minute मोदींनी पुन्हा करुन दिली आठवण

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 5 April 2020

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (ता. ०५) रविवारी #9pm9minute असे ट्विट करीत सर्वांना आजच्या रात्री ०९ वाजताच्या कार्यक्रमाची आठवण करून दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या शुक्रवारी सकाळी 9 वाजता देशाला उद्देशून भाषण केले होते. त्यात त्यांनी पाच एप्रिलला 130 भारतीयांकडून पाच एप्रिलला रात्री 9 वाजता 9 मिनिटे मागितली होती. या काळात कोरोनाच्या अंध:काराशी लढण्यासाठी त्यांनी देशवासियांना महासंकल्प दिला आहे.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (ता. ०५) रविवारी #9pm9minute असे ट्विट करीत सर्वांना आजच्या रात्री ०९ वाजताच्या कार्यक्रमाची आठवण करून दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या शुक्रवारी सकाळी 9 वाजता देशाला उद्देशून भाषण केले होते. त्यात त्यांनी पाच एप्रिलला 130 भारतीयांकडून पाच एप्रिलला रात्री 9 वाजता 9 मिनिटे मागितली होती. या काळात कोरोनाच्या अंध:काराशी लढण्यासाठी त्यांनी देशवासियांना महासंकल्प दिला आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

5 एप्रिलला रात्री 9 वाजता 9 मिनिटे घरातील सर्व लाइटस बंद करा आणि दरवाजात किंवा बाल्कनीत या.  मेणबत्ती, दिवा, टाॅर्च किंवा मोबाईल फ्लॅश लाइट नऊ मिनिटे झळकवा. यातून कोरोनाशाचा अंधकार दूर  होऊन प्रकाशाकडे आपण मार्गक्रमण करू. कोरोना विरुद्धच्या लढाईत जिंकण्याची शक्ती यातूनच मिळणार आहे, असेही मोदी यांनी लोकांशी बोलताना सांगितले.

राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ६२५; कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण

या वेळी जनता कर्फ्यूबरोबरच लॉकडाऊनच्या काळात दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले होते. आज पुन्हा रात्रीच्या उपक्रमाची आठवण त्यांनी देशवासियांना करून दिली आहे. #9pm9minute हा हॅशटॅग वापरून अनेकांनी मोदींच्या समर्थनार्थ ट्विट केले असता मोदींनी त्या ट्विट्सना रिट्विट करत धन्यवाद मानले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pm Narendra modi tweets about night event on 05th April