Coronavirus : विदेशी पर्यटकांसाठी पोर्टल

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 7 April 2020

विविध प्रकारची मदत
आत्तापर्यंत अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कोस्टारिका या देशातील पर्यटकांना मदत करण्यात आली आहे. यामध्ये वैद्यकीय उपचारांसाठी आलेले प्रवासी, पर्यटनासाठी आलेले व औषधे संपलेले पर्यटक अशांचाही समावेश होता.

नवी दिल्ली - कोरोनाव्हायरसच्या साथीमुळे भारतात अडकलेल्या ७६९ विदेशी प्रवाशांनी पर्यटन मंत्रालयाच्या ‘स्ट्रॅंडेडइनइंडियाडॉटकॉम’ या पोर्टलवर नोंदणी केल्याचे पर्यटन मंत्रालयातर्फे सांगण्यात आले. मंत्रालयाने ३१ मार्चपासून हे पोर्टल सुरु केले आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोनामुळे देशात जाहीर झालेल्या टाळेबंदीनंतर देशात विविध ठिकाणी विदेशी पर्यटक अडकून पडले. चार दिवसांपूर्वीच दिल्लीच्या इंडिया गेटजवळ परदेशी पर्यटकांनी भरलेल्या दोन बस अडविण्यात आल्या होत्या. हे पर्यटक डेहराडूनहून आल्याचे सांगत होते, परंतु त्याहून अधिक माहिती ते देत नव्हते. पर्यटन आणि परराष्ट्र या दोन्ही मंत्रालयांनी यासंदर्भात मौन पाळले आणि तपशील सांगण्याचे नाकारले. त्यामुळे या परदेशी पर्यटकांबाबतही वाद उत्पन्न झाला होता. 

पर्यटन मंत्रालयाने ३१ मार्चला हे पोर्टल सुरु केले. अडकून पडलेल्या परदेशी प्रवाशांना येथे नोंदणी करण्यास सांगण्यात आले. त्याचप्रमाणे सर्व राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांना या प्रवाशांच्या सोयीसुविधांबाबत काळजी घेण्यासाठी एका स्वतंत्र अधिकाऱ्याची नेमणूक करण्यास सांगण्यात आले. परराष्ट्र मंत्रालय व पर्यटन विभाग दोन्हीही या स्वतंत्र अधिकाऱ्याबरोबर कामाचा समन्वय राखणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Portal for foreign tourists