'मोबाईल कंपन्यांनी एक महिनाभर कॉलिंग सेवा निःशुल्क करावी'

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 29 मार्च 2020

घराकडे निघालेल्या अनेकांचा मोबाईल रिचार्ज संपला असल्याने ते कुटुंबियांशी संपर्क साधू शकत नाहीत. त्यामुळे इनकमिंग आणि आऊटगोईंग व्यवस्था एक महिन्यासाठी निःशुल्क करावी जेणेकरून या संकटकाळात त्यांना कुटुंबियांशी बोलता येईल.

नवी दिल्ली -  स्थलांतरित मजुरांच्या मदतीसाठी मानवतेच्या दृष्टिकोनातून मोबाईल कंपन्यांनी एक महिनाभर कॉलिंग सेवा निःशुल्क करावी, असे आवाहन काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी वद्रा यांनी केले आहे. देशवासीयांना मदत करणे राष्ट्रीय कर्तव्य असल्याची आठवणही त्यांनी करून दिली आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बीएसएनएल, रिलायन्स जिओ, एअरटेल, व्होडाफोन आयडीया या प्रमुख मोबाईल कंपन्यांच्या प्रमुखांना व्यक्तिशः पाठविलेल्या पत्रात प्रियांका गांधी यांनी म्हटले आहे, की देशभरात मजुरांचे पलायन सुरू आहे. तहान, भूक, आजारपणाशी संघर्ष करत आपल्या घरी परतण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहे. या संकटाच्या काळात देशावासीयांची मदत करणे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे. घराकडे निघालेल्या अनेकांचा मोबाईल रिचार्ज संपला असल्याने ते कुटुंबियांशी संपर्क साधू शकत नाहीत. त्यामुळे इनकमिंग आणि आऊटगोईंग व्यवस्था एक महिन्यासाठी निःशुल्क करावी जेणेकरून या संकटकाळात त्यांना कुटुंबियांशी बोलता येईल. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षाही प्रियांका गांधींनी बीएसएनएलचे अध्यक्ष प्रवीणकुमार पुरवार, एअरटेलचे प्रमुख सुनील भारती मित्तल, जिओचे प्रमुख मुकेश अंबानी, व्होडाफोन-आयडीयाचे प्रमुख कुमार मंगलम बिर्ला यांना पाठविलेल्या पत्रात व्यक्त केली आहे.

Coronavirus : कोरोनामुळं हे बेस्ट झालं; 'या' शहरांनी घेतला मोकाळा श्वास


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: priyanka-gandhi-Appeal to-jio-airtel-vodafone-idea-and-bsnl-for-free-calling-during-coronavirus-lockdown