Coronavirus: संसर्गाची साखळी तोडा

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 21 मार्च 2020

तुम्ही या पैकी एक जरी दुवा साखळी तोडली तर, तुम्हाला इतरांपासून होणाऱ्या संसर्गापासून  स्वत:चा बचाव करू शकता. 

तुम्ही या पैकी एक जरी दुवा साखळी तोडली तर, तुम्हाला इतरांपासून होणाऱ्या संसर्गापासून  स्वत:चा बचाव करू शकता. 
१. विषाणू
कोरोनाव्हायरस (कोविड-१९) हा विषाणूपासून होणारा आजार आहे. 
ही साखळी तोडा : 
घाबरू नका, प्रतिबंध करा. संयम राखत निर्णायक कृती करा. 
योग्य प्रकारे हात धुवून तुम्ही विषाणू नष्ट करू शकता. एकमेकांपासून योग्य अंतरावरून व्यवहार करा. वारंवार स्पर्श होणाऱ्या वस्तू स्वच्छ ठेवा. 

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

२. विषाणूचा मुक्काम
हा विषाणू श्‍वासनलिकेत जाऊन बसतो. तसेच, तो शरीराच्या इतर भागांवरही तीन तास ते तीन दिवसांपर्यंत तग धरुन राहू शकतो. संसर्ग झालेल्या व्यक्ती त्यांना लक्षणे जाणविण्याच्या आधीपासूनच किंवा त्यांना स्वत:ला जाणीव नसतानाही विषाणूच्या वाहक असू शकतात. 
ही साखळी तोडा : 
    जणू प्रत्येकाला संसर्ग झाला आहे, असे समजून त्यांच्यापासून अंतर राखा. संसर्ग पसरणार नाही याची काळजी घ्या.

३.  बाहेर पडण्याचा मार्ग
संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या शिंका, खोकला किंवा बोलताना विषाणू हवेत मिसळतो आणि इतर पृष्ठभागांवर बसतो. येथे अस्वच्छ हात लागल्यास संसर्ग होऊ शकतो. 
ही साखळी तोडा : 
 खोकला किंवा शिंक आल्यास बाही किंवा टिश्‍यू पेपरचा वापर करा, हातावर खोकू अथवा शिंकू नका. (हस्तांदोलन, क्रेडिट कार्ड, पैसे, पेट्रोल पंप, किबोर्ड, दुकानातील वस्तू याद्वारे विषाणूचा प्रसार होऊ शकतो.)
    वापरलेला टिश्‍यू पेपर लगेचच कचरापेटीत टाका. 
    घरी पोहोचताच तातडीने हात स्वच्छ धुवा.
    सर्वांपासून अंतर ठेवून राहा, गर्दी टाळा. 
    इतरांपासून कमीत कमी सहा फूट अंतर ठेवा.
स्रोत ः सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल; डब्लूएचओ

४. संसर्ग
हा विषाणू दुसऱ्या व्यक्तीशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संपर्क आल्याने पसरू शकतो. 
ही साखळी तोडा : 
    हस्तांदोलन किंवा मिठी मारणे टाळा
    कोणी खोकत असल्यास किंवा शिंकत असल्यास दूर जा.
     घरीच थांबा 
     शिंकल्यावर किंवा खोकल्यावर आणि बाहेरून आल्यावर २० सेकंदांहून अधिक काळ हाथ साबणाने धुवा. 
     हात न धूता डोळे, नाक आणि चेहऱ्याला स्पर्श करू नका
     नेहमी वापरत असलेल्या वस्तू किंवा साधने स्वच्छ ठेवा

५. प्रवेशाचा मार्ग
हा विषाणू नाक अथवा तोंडाद्वारे घेतल्या जाणाऱ्या श्‍वासाद्वारे आणि डोळ्यांच्या मार्गाने शरीरात प्रवेश करतो.
ही साखळी तोडा : 
    प्रत्येक जण बाधित असल्याचे समजून त्यांच्यापासून किमान सहा फूट अंतर बाळगा. 
    तुमचे हात पूर्ण स्वच्छ असल्याशिवाय चेहऱ्याला हात लावू नका.

६. नवीन रुग्ण
तुमची रोग प्रतिकारशक्ती ही विषाणूला रोखण्याचा अखेरचा दुवा आहे. वयोवृद्ध व्यक्ती आणि आजारी असलेल्या व्यक्तींना विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका अधिक आहे. 
ही साखळी तोडा : 
    तुमची रोग प्रतिकारशक्ती वाढवा (योग्य झोप घ्या, भरपूर पाणी प्या, व्यायाम करा, पौष्टिक अन्न सेवन करा, मानसिक तणाव नियंत्रित ठेवा).
    तुम्ही आजारी व्यक्तीची काळजी घेत असल्यास विषाणूपासून स्वत:चा बचाव करण्याची पूर्ण काळजी घ्या. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Protect yourself from Coronavirus