तलवारीने कापलेला त्या पोलिस अधिकाऱ्याचा हात डॉक्टरांनी पुन्हा जोडला

वृत्तसंस्था
Monday, 13 April 2020

पंजाबमधील पोलिस अधिकऱ्याचा तलवारीने कापलेला हात डॉक्टरांनी पुन्हा जोडला आहे. डॉक्टरांकडून पोलिस अधिकाऱ्यावर यशस्वी सर्जरी करण्यात आलेली असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. ही सर्जरी जवळपास साडेसात तास चालली आहे.

चंदीगड : पंजाबमधील पोलिस अधिकऱ्याचा तलवारीने कापलेला हात डॉक्टरांनी पुन्हा जोडला आहे. डॉक्टरांकडून पोलिस अधिकाऱ्यावर यशस्वी सर्जरी करण्यात आलेली असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. ही सर्जरी जवळपास साडेसात तास चालली आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी याबाबत ट्विट करुन सांगितले आहे. अमरिंदर सिंग यांनी म्हटले आहे की, मला सांगण्यात आनंद होत आहे की, साडे सात तासांच्या प्रदीर्घ सर्जरीनंतर सहायय्क पोलिस निरीक्षक हरजीत सिंह यांचा हात जोडण्यात यश आलं आहे. मी डॉक्टरांची सर्व टीम आणि सपोर्ट स्टाफचे आभार मानतो. प्रकृती लवकर सुधारण्यासाठी हरजीत सिंह यांना शुभेच्छा, ही सर्जरी डॉक्टरांसाठी प्रचंड आव्हानात्मक होती. साडेसात तास चाललेल्या प्रदीर्घ प्लास्टिक सर्जरीनंतर डॉक्टरांना हात जोडण्यात यश मिळालं.

नेमके काय घडलं?
सहाय्यक पोलिस निरीक्षक हरजीत सिंह आणि इतर दोन पोलिस कर्मचाऱ्यांवर रविवारी सकाळी निहंगा समुदायातील टोळक्याकडून हल्ला करण्यात आला. भाजी मंडईत जाताना कर्फ्यू पास मागितल्याने त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला. हल्ला झाल्यानंतर त्यांनी पळ काढला होता. पोलिसांनी कारवाई करत सात जणांना अटक केली आहे. यामधील पाच जण हल्लेखोर आहेत. अटक करताना पोलिस आणि आरोपींमध्ये गोळीबार झाला. या गोळीबारात अटक करण्यात आलेला एक आरोपी जखमी झाला आहे.

धक्कादायक ! कर्फ्यूचा पास विचारला; पोलिसाचा हातच कापला !

हल्ल्याची व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली होती. व्हिडीओत हरजीत सिंह मदत मागताना दिसत आहेत. यावेळी एक व्यक्ती त्यांचा तुटलेला हात उचलून देतो. यानंतर दुचाकीवरुन त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं होतं. हल्ला करण्यात आल्यानंतर आरोपी गुरुद्वारात जाऊन लपले होते. पोलिसांनी विनंती करुनही आत्मसमर्पण करण्यास त्यांनी नकार दिला. यानंतर पोलिस आणि आरोपींमध्ये गोळीबार झाला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Punjab cops hand successfully reattached after being chopped