Coronavirus : देशाला 'स्मार्ट' उपायांची गरज : राहुल गांधी

वृत्तसंस्था
Tuesday, 14 April 2020

कोरोनाचा देशात प्रादुर्भाव वाढत आहे. अशात देशाला स्मार्ट उपायांची गरज असल्याचे मत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी व्यक्त केले आहे.

नवी दिल्ली : कोरोनाचा देशात प्रादुर्भाव वाढत आहे. अशात देशाला स्मार्ट उपायांची गरज असल्याचे मत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी व्यक्त केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी तीव्र चिंता व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदींना काही सल्लेही दिले आहेत. पंतप्रधानांनी देशातल्या गरीब लोकांसाठी मोठ्या आर्थिक पॅकेजची घोषणा करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

लॉकडाऊन हे गरीबांसाठी मोठं संकट ठरलं आहे. शेतकरी आपला माल विकू शकत नाही. मजुरांचे हाल होत आहेत. अशा पार्श्वभूमीवर देशाला स्मार्ट उपायांची गरज असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. कोव्हिडच्या आधी देशाची अर्थव्यवस्था रसातळाला गेली होती. सरकारला कोरोनाचं गांभीर्य उशीरा कळालं. आधीच उपाययोजना सुरू केल्या असत्या तर ही परिस्थिती ओढवली नसती असंही राहुल गांधी यांनी म्हटलं होतं. या काळात सरकारने तातडीने कुठली पावलं उचलावीत याच्या सूचनाही काँग्रेसने सरकारला केल्या आहेत. आता कोरोनाच्या निमित्ताने सरकार आपलं अपयश लपविण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका काँग्रेसने केली होती. 

Coronavirus : यापेक्षा मोठी देशभक्ती नाही; सोनिया गांधीचा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर

दरम्यान, देशभर कोरोनाचा प्रकोप वाढत आहे. रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. गेल्या 24 तासांमध्ये 51 जणांचा मृत्यू झाला. ही आत्तापर्यंतची सर्वात जास्त संख्या आहे. तर कोरोना रुग्णांची सख्या 9352 वर पोहोचली आहे तर मृत्यूची संख्या 324 वर गेली आहे. 8048 रुग्ण उपचार घेत असून 979 जणांना सुट्टी देण्यात आली आहे. मात्र, देशात कोरोनाच्या उद्रेकाची सर्वोच्च स्थिती अजूनही आलेली नाही अशी माहिती आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल काल (ता. १३) यांनी दिली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rahul Gandhis Smart Upgrade Demand For One-Size-Fit-All Lockdown