
- जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
नवी दिल्ली : जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली.
शक्तिकांता दास यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध घोषणा केली. यामध्ये त्यांनी रिझर्व्ह रेपो दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. व्याजदर कमी करण्याचा निर्णयही घेतला आहे. त्यामुळे हफ्त्याच्या रकमेत कमी होणार आहे. अनेक क्षेत्रांना कोरोनाचा फटका बसत आहे. कर्जावरील व्याजदर ५.१५ वरून ४.४ वर करण्यात आले आहे. तसेच या कोरोना व्हायरसमुळे जगभरात मंदी येण्याची शक्यता आहे.
Repo rate reduced by 75 basis points to 4.4.%. Reverse repo-rate reduced by 90 basis points to 4%: RBI Governor Shaktikanta Das pic.twitter.com/eBb0WPAG21
— ANI (@ANI) March 27, 2020
मागणी कमी होऊन महागाई वाढण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. कर्जाचे तीन महिने हप्ते नाही भरले तरी त्याचा सिबिल स्कोरवर त्याचा परिणाम होणार नसल्याचे दास यांनी सांगितले. केंद्र सरकारने काल 1.70 लाख कोटी रूपयांच्या मदतीची घोषणा केली होती. त्यानंतर आज आरबीआयने घोषणा करून नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.
रिझर्व्ह बँकेने रेपो दरात ०.७५ टक्क्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे रेपो दर ५.१५ टक्क्यांवरून ४.४ टक्क्यांवर आला आहे. तर रिव्हर्स रेपो दरात ०.९० टक्क्यांची कपात केली आहे. यामुळे रिव्हर्स रेपो दर ४.९० टक्क्यांवरून ४ टक्क्यांवर आला आहे.
याव्यतिरिक्त अल्पकालावधीच्या कर्जाच्या व्याजदरात कपात करण्याची घोषणाही शक्तिकाता दास यांनी केली. याव्यतिरिक्त रिवर्स रेपो दरातही ०.९० टक्क्यांची कपात करण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेनं घेतला आहे. रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे सर्व प्रकारच्या कर्जाच्या हप्त्याची रक्कम कमी होणार आहे. गृह, वाहन, उद्योग, या साठीच्या कर्जदारांना याचा उपयोग होईल.