अशा खडतर परिस्थितीत सरकारला मदत करायला तयार : रघुराम राजन

वृत्तसंस्था
Sunday, 12 April 2020

खडतर परिस्थितीत सरकारने विचारल्यास मदत करायला तयार असल्याचे मत आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी म्हटले आहे. त्यांनी एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत असे प्रतिपादन केले आहे.

नवी दिल्ली : जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना भारतातही कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. अशात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने संपूर्ण देशभरात लॉकडाउन जाहीर केलं आहे. यानंतर सर्व व्यवसाय ठप्प झाल्याने भारतीय अर्थव्यवस्था अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. या खडतर परिस्थितीत सरकारने विचारल्यास मदत करायला तयार असल्याचे मत आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी म्हटले आहे. त्यांनी एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत असे प्रतिपादन केले आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

देशातली परिस्थिती लक्षात घेता काही राज्यांमध्ये हे लॉकडाउन ३० एप्रिलपर्यंत वाढवण्यात येणार आहे. मात्र, या लॉकडाउनचा भारतीय अर्थव्यस्थेवर मोठा परिणाम होत आहे. अनेक कंपन्या या काळात बंद असल्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसतोय. याचसोबतच लॉकडाउनमुळे अनेक छोटे उद्योगधंदे, शेतकरी यांच्यावरही परिणाम होत आहे. 

अमेरिकेत कोरोनाचे थैमान; डोनाल्ड ट्रम्प घेणार मोठा निर्णय

सध्याच्या घडीला संपूर्ण जग हे आर्थिक मंदीच्या दिशेने झुकत चाललेलं आहे. पुढील वर्षात मला आशा आहे की ही परिस्थिती सुधारलेली असेल. मात्र, सध्या कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी आपण काय पावलं उचलत आहोत, त्यावर हे अवलंबून असणार आहे. भारतासाठी परकीय चलन हा नेहमी चिंतेचा विषय राहिलेला आहे. सध्या इतर विनकसनशील देशांच्या तुलनेत आपली परिस्थिती ही चांगली आहे. डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची घसरण हा देखील एक चिंतेचा विषय आहेच, मात्र ब्राझील सारख्या देशात सध्याची असलेली परिस्थिती पाहता भारतामध्ये परिस्थिती नियंत्रणात आहे. अशा परिस्थितीत सरकारने त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घ्यायला हवा मग ते विरोधी पक्षातलेही का असेना… रघुराम राजन भारताच्या आर्थिक परिस्थितीबद्दल बोलत होते. याचसोबत सध्याच्या परिस्थितीत सरकारने आपल्याला मदत मागितली तर आपण तयार असल्याचंही राजन यांनी स्पष्ट केलं.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ready to help India in dealing with Covid stress if asked says Raghuram Rajan