जिओ, एअरटेल, व्होडाफोन किंवा आयडिया प्रीपेड वापरताय तर...

वृत्तसंस्था
Sunday, 19 April 2020

जिओ, एअरटेल, व्होडाफोन किंवा आयडियाच्या प्रीपेड वापरताय तर तुमच्यासाठी ही मोठी बातमी आहे...

रिलायन्स जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया या देशातील आघाडीच्या दूरसंचार कंपन्यांनी आपल्या प्रीपेड सेवांची कालमर्यादा ३ मे पर्यत वाढवली आहे. कोरोना विषाणूच्या संकटामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर या कंपन्यांनी हा निर्णय घेतला आहे. अल्पउत्पन्न गटातील ग्राहकांच्या अडचणींची दखल घेत या दूरसंचार कंपन्यांनी प्रीपेड सेवांची व्हॅलिडिटी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

'या सवलतीचा लाभ फक्त अल्पउत्पन्न गटातील ग्राहकांनाच नाही तर जे ग्राहक या कठीण परिस्थितीत रिचार्ज करू शकत नाहीत त्या सर्वांनाच याचा लाभ होईल', असे रिलायन्स जिओने म्हटले आहे. जिओअॅप आणि जिओ वेबसाईटचा वापर करून हे रिचार्ज करता येणार आहे. याशिवाय जिओ असोसिएट प्रोग्रॅमद्वारे ग्राहकांना आपल्या मित्रांचे, कुटुंबियांचे किंवा परिचितांसाठीदेखील रिचार्ज करता येणार आहे. त्यासाठी त्या ग्राहकाला कमिशनदेखील मिळणार आहे. या सुविधेमुळे जे ग्राहक डिजिटल माध्यमाचा वापर करू शकत नाहीत किंवा प्रत्यक्ष रिचार्ज करू शकणार नाहीत त्यांना मदत होणार आहे, असे जिओचे म्हणणे आहे.

Coronavirus : दिलासादायक ! देशातील आणखी एक राज्य कोरोनामुक्त

एअरटेल आणि व्होडाफोन आयडियानेसुद्धा आपल्या प्रीपेड सुविधेची व्हॅलिडिटी ३ मेपर्यत वाढवली आहे. सद्य परिस्थितीत आपले जवळपास ३ कोटी ग्राहक आपल्या प्रीपेड सुविधेसाठी रिचार्ज करू शकत नसल्याचे एअरटेलने म्हटले आहे. या सवलतीमुळे ज्या एअरटेल ग्राहकांच्या प्रीपेड सेवेची कालमर्यादा संपली असेल त्यांनादेखील इनकमिंग कॉल येऊ शकणार आहेत. व्होडाफोन आयडियानेदेखील हीच सवलत दिली आहे. त्यामुळे त्यांच्या ग्राहकांसाठीदेखील प्रीपेडची व्हॅलिडिटी संपल्यावरदेखील इनकमिंग कॉलची सुविधा चालू राहणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Reliance Jio, Airtel, Vodafone Idea extend prepaid validity till May 3