कोरोनाच्या भीतीमुळे आईचा मृतदेह स्वीकारण्यास मुलाचा नकार

वृत्तसंस्था
Wednesday, 8 April 2020

अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतरही अंत्यसंस्कार नाहीच

- अंत्यसंस्कारावेळी कुटुंबियांची उपस्थिती

लुधियाना : जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले. भारतातही कोरोनाग्रस्त रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. या व्हायरसची लागण होऊ नये, यासाठी विशेष खबरदारी घेतली जात आहे. मात्र, पंजाबमध्ये एक वेगळाच प्रकार समोर आला आहे. कोरोना व्हायरसचा संसर्ग होईल, या भीतीमुळे एका मुलाने स्वतःच्या आईचा मृतदेह स्वीकारण्यास नकार दिल्याची घटना समोर आली आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पंजाबच्या लुधियानामधील शिमलापुरी गावातील वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. या महिलेचा मृत्यू कोरोना व्हायरची लागण झाल्याने झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळेच या व्हायरसची लागण होईल, या भीतीपोटी संबंधित महिलेच्या कुटुंबियांनी तिचा मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे या महिलेवर अंत्यसंस्कार करण्याचा प्रश्न प्रशासनासमोर होता. मात्र, अखेर जिल्हा प्रशासनाने हा प्रश्न मार्गी लावत त्यांनीच अंत्यसंस्कार केले. 

Latest Western

अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतरही अंत्यसंस्कार नाहीच

कोरोना व्हायरसची लागण झाल्याने मृत्यू झाल्याचे समजल्यानंतर प्रशासनानेही विशेष खबरदारी घेतली. तसेच त्यांनी संबंधित महिलेच्या कुटुंबियांना अंत्यसंस्कारावेळी कोरोनाच्या संसर्गापासून बचावाची खबरदारी घेतली जाईल, असे आश्वासनही दिले होते. मात्र, तरीदेखील कुटुंबियांनी मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला, अशी माहिती अतिरिक्त पोलिस उपायुक्त इकबाल सिंह संधू यांनी दिली.

अंत्यसंस्कारावेळी कुटुंबियांची उपस्थिती

या वृद्ध महिलेच्या कुटुंबियांकडून मृतदेहावर अंत्यसंस्कार करावे, यासाठी त्यांना दोनदा संपर्क साधण्यात आला. मात्र, कोरोनाचा संसर्ग होईल, या भीतीपोटी कुटुंबियांनी मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला. त्यानंतर प्रशासनाने त्या वृद्ध महिलेवर अंत्यसंस्कार केले. पण यावेळी कुटुंबियांची उपस्थितीही होती. मात्र, ते सुमारे 100 मीटर अंतर लांब उभे होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Scared of catching coronavirus infection son refuses to cremate mother