esakal | Coronavirus : दिलासादायक ! देशातील आणखी एक राज्य कोरोनामुक्त
sakal

बोलून बातमी शोधा

Second COVID-19 patient of Manipur found negative

देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असतानाच एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. अरुणाचल प्रदेशनंतर आता भारतातील आणखी एक राज्य म्हणजे मणिपूरही कोरोनामुक्त झाले आहे. एका बाजूला नागरिकांची भीती वाढत असताना दुसऱ्या बाजूला ही दिलासा देणारी बातमी आहे.

Coronavirus : दिलासादायक ! देशातील आणखी एक राज्य कोरोनामुक्त

sakal_logo
By
वृत्तसंस्था

इन्फाळ : देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असतानाच एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. अरुणाचल प्रदेशनंतर आता भारतातील आणखी एक राज्य म्हणजे मणिपूरही कोरोनामुक्त झाले आहे. एका बाजूला नागरिकांची भीती वाढत असताना दुसऱ्या बाजूला ही दिलासा देणारी बातमी आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

देशातील काही परिसर कोरोनामुक्त होण्यात यश मिळत आहे. मणिपूरमधील दुसरा रुग्ण चाचणीनंतर निगेटिव्ह आला आहे. 65 वर्षांच्या रुग्णावर कोरोनाचे RIMSमध्ये उपचार सुरू होते. त्यांच्यावरील उपचारानंतर तिसरी टेस्ट निगेटिव्ह आली आहे. 31 मार्च रोजी 65 वर्षीय वृद्धाला मणिपुरातील RIMS रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं होतं. हा रुग्ण दिल्लीतील निजामुद्दीन इथे झालेल्या तबलिगी जमातच्या कार्यक्रमासाठी उपस्थित होता. मणिपूरमध्ये कोरोनाचे दोनच रुग्ण सापडले होते. याआधी पहिल्या रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला होता. तर काल (ता. १८) शनिवारी दुसऱ्या रुग्णाची तिसरी टेस्ट निगेटिव्ह आल्यानं त्यालाही डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Coronavirus : कोरोनामुळे पोलिस अधिकाऱ्याचा मृत्यू 

देशात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी 3 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. देशातील काही भाग कोरोनामुक्तच्या दिशेनं वाटचाल करताना पाहायला मिळत आहेत. गडचिरोलीतील काही भाग, लातूर, उस्मानाबाद, अरुणाचल प्रदेश आणि आता मणिपूर ही खरंच दिलासा देणारी बातमी आहे. दरम्यान, देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 16 हजार 365 वर पोहोचला आहे. आयसीएमआरने दिलेल्या माहितीनुसार शनिवारपर्यंत 3,54,969 लोकांच्या 3,72, 123 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 16, 365 नमुन्यांचचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

loading image
go to top