Coronavirus : २४५ रुपयांची किट ६०० रुपयांना का? देश माफ करणार नाही : राहुल गांधी

पीटीआय
Monday, 27 April 2020

कोरोनाच्या चाचणीसाठी खरेदी करण्यात आलेल्या रॅपिड टेस्टिंग किटवरून काँग्रेसनं केंद्र सरकार आणि इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्चवर (आयसीएमआर) टीका केली आहे. आयसीएमआरला २४५ रूपयांमध्ये आयात करण्यात आलेली रॅपिड टेस्टिंग किट ६०० रूपये प्रति किट या दरात का खरेदी करावी लागली असा प्रश्न काँग्रेसकडून करण्यात आला आहे. राहुल गांधीनी याबाबत ट्विट करत देश कधीच माफ करणार नाही असे म्हटले आहे.

नवी दिल्ली - कोरोनाच्या चाचणीसाठी खरेदी करण्यात आलेल्या रॅपिड टेस्टिंग किटवरून काँग्रेसनं केंद्र सरकार आणि इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्चवर (आयसीएमआर) टीका केली आहे. आयसीएमआरला २४५ रूपयांमध्ये आयात करण्यात आलेली रॅपिड टेस्टिंग किट ६०० रूपये प्रति किट या दरात का खरेदी करावी लागली असा प्रश्न काँग्रेसकडून करण्यात आला आहे. राहुल गांधीनी याबाबत ट्विट करत देश कधीच माफ करणार नाही असे म्हटले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

चीनने कोविड-१९ च्या रॅपिड टेस्टची किट भारतीय चिकित्सा अनुसंधान परिषद म्हणजेच आसीएमआरला २४५ रुपयात दिले आहे. यामध्ये आयसीएमआरने ५ लाख किटची ऑर्डर ही प्रति ६०० रुपये दराने दिली. यामुळे खूप मोठा घोटाळा समोर आला आहे. या संकाटाच्या काळातही फायद्याचा विचार केला जात असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

राहुल गांधी म्हणाले, 'जेव्हा संपूर्ण देश कोविड-१९ या संकटाशी लढत आहे. तेव्हा ही काही लोकं स्वतःचा फायदा कसा करावा याचा विचार करतात. या भ्रष्ट मानसिकतेची लाज वाटते. घृणास्पद आहे सगळं. मी पंतप्रधानांकडे मागणी करतो की, अशा फायद्याचा विचार करणाऱ्यांवर लवकरात लवकर कारवाई केली जावी. देश त्यांना कधीच माफ करणार नाही. 

दरम्यान, कोविड-१९ च्या रॅपिड टेस्टच्या आयात आणि निर्यातीच्या मुद्यावरून दिल्लीच्या उच्च न्यायालयात खटला सुरू आहे. हे किट भारतात आयात करण्यात आले तेव्हा २४५ रुपये प्रति किटला आकारले गेला. मात्र आयसीएमआर हे किट ६०० रुपयाला विकले. यामध्ये त्यांनी १४५% फायदा घेतला आहे. दिल्ली उच्च न्यायालयात जस्टिस नाजमी वजीरीच्या सिंगल बेंचने याचा दर ३३% कमी करून प्रति कीट ४०० रुपयाला विकण्याचे आदेश दिले आहेत. या किटवर वितरकाला ६१%  फायदा मिळत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Some earning profits in sale of Covid-19 test kits to government, PM must intervene: Rahul Gandhi