धक्कादायक...कोरोनामुळे बहिष्कृत युवकाची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 5 April 2020

कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आल्यानंतरही समाजाने बहिष्कृत केलेल्या 37 वर्षीय युवकाने आत्महत्या केली आहे.

उना (हिमाचल प्रदेश) ः कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आल्यानंतरही समाजाने बहिष्कृत केलेल्या 37 वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची घटना हिमाचल प्रदेशाच्या उना जिल्ह्यातील बांगारा गावात घडली.

मोहम्मद दिलशाद असे मृत युवकाचे नाव असून त्याला कोरोना झाल्याचा संशय आला. त्याचे काही दिवस विलगीकरण करतानाच त्याची तपासणी करण्यात आली. कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे त्याला घरी पाठवण्यात आले; मात्र गावातील लोकांनी त्याच्यावर बहिष्कार घातला. त्यामुळे त्रासलेल्या दिलशादने घरी परतल्यावर एका दिवसातच आत्महत्या केली. दिल्लीतील निजामुद्दीनला झालेल्या मरकजात सहभागी झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात दिलशाद होता असा दावा गावकऱ्यांनी केला.

हे ही वाचा... 

क्वारंटाईन व्यक्तीने रुग्णालयातून पळ काढल्याने गावात धस्स!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Suicide of youth boycotted due to corona in himachal pradesh