esakal | तबलीगी जमातची नियमांकडे डोळेझाक; 'या' तारखा धडकी भरवतील!
sakal

बोलून बातमी शोधा

tablighi jamaat markaz broke all rules date information marathi

तबलीगी जमातकडून सांगण्यात आले आहे की, त्यांना १२ मार्चपासून लोकांना परत पाठवणे सुरु करण्यात आले होते. पण, इमारतीत कार्यक्रम सुरूच ठेवले होते.

तबलीगी जमातची नियमांकडे डोळेझाक; 'या' तारखा धडकी भरवतील!

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

नवी दिल्ली Coronavirus : जगभरात कोरोना व्हायरसचा धोका वाढत आहे, भारतात 21 दिवसांच्या लॉक डाऊन सुरू असताना दिल्लीत निजामुद्दीन येथे तबलीगी जमातने सरकारी नियमांकडे डोळेझाक करत धार्मिक कार्यकर्मांचे आयोजन सुरुच ठेवल्याने शेकडो लोकांना कोरोनाची लागण झाली असल्याची शक्यता आहे. तर ,तबलीगी जमातने मात्र सरकारच्या सर्व नियमांचे पालण केले असल्याचा दावा केला आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

तबलीगी जमातकडून सांगण्यात आले आहे की, त्यांना १२ मार्चपासून लोकांना परत पाठवणे सुरु करण्यात आले होते. पण जमातच्या मुख्यालयात सापडलेल्या शेकडो नागरीक व कागदपत्रांवरुन सरकारी नियमांना धाब्यावर बसवून कर्यक्रम सुरुच ठेवला गेल्याचे स्पष्ट झाले आहे. तबलीगी जमात मध्ये सापडलेल्या 1033 लोकांना वेगवेगळ्या दवाखान्यांमध्ये भर्ती करण्यात आले आहे. या पैकी 24 लोक कोरोना पॉजीटिव आहेत तर 700 जनांना कोरंटाइन मध्ये ठेवण्यात आले आहे. 

12 मार्च
देशात कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता राजन्यायीक व रोजगार या दोन कारणासांठी दिला जाणारा व्हिसा सोडून बाकी सर्व प्रकारच्या व्हिजा देणे बंद करण्यात आले होते. तबलीगी जमातकडून सरकारच्या सर्व निर्देशांचे पालन केल्याचा दावा इथे खोटा ठरतो. कारण जमात मध्ये 300 विदेशी नागरीक सापडले आहेत. या सगळ्यांवर विजा नियम तोडल्याचा संशय आधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

17 मार्च
दिल्ली सरकारने 17 मार्चला 50 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यावर बंदी घातली होती. सरकारचे स्पष्ट आदेश होते की, कुठल्याही प्रकारच्या राजकीय, धार्मिक तसेच खासगी कार्यक्रमाचे आयोजन करता येणार नाही. नाईट क्लब तसेच, स्पा देखील बंद करण्यात आले होते. तरी देखील तबलीगी जमातच्या इमारतीत कार्यक्रम सुरुच ठेवण्यात आला. 

आणखी वाचा - कोरोना उपचारांसाठी होमिओपॅथीला संधी मिळणार!

19 मार्च
दिल्ली सरकारने दिलेल्या नव्या आदेशानुसार 20 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्याची बंदी करण्यात आली, जमातकडून सांगण्यात येत आहे की त्यांनी लोकांना परत पाठवणे सुरू केले होते. पण, तेथे सापडलेल्या लोकांच्या संख्या पाहाता आदेशाकडे दुर्लक्ष केल्याचे दिसते. 

22 मार्च
पंतप्रधान नरेंद्र मोदीनी देशात जनता कर्फ्युची घोषणा केली आणि लोकांना घरामध्ये राहण्याची विनंती केली गेली. तरी, देखील जमातच्या इमारतीत शेकडो लोक इकत्र राहत होते.

आणखी वाचा - जेईई मेन्स परीक्षा आता मे महिन्यात होणार

24 मार्च
देशात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता 24 तारखेला देशभरात लॉक डाऊनची घोषणा करण्यात आली. देशातील सगळ्या नागरिकांना घरातच राहण्याच्या सूचना करण्यात आल्या. त्यानंतर आठवडाभराने लोकांना लॉक डाऊनमुळे घरी जाता आले नाही, असे तबलीगी जमात कडून सांगण्यात येत आहे. 

30- 31 मार्च 
निजामुद्दीन येथे स तबलीगी जमातच्या धार्मिक कार्यक्रमात देश विदेशातील 1033 लोक सापडले आहेत. त्यापैकी 24 लोक कोरोना पॉझीटिव्ह आहेत. तर 700 जणांना क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आले आहे. त्या कार्यक्रमातून परतलेल्या तमिळनाडूत सहा लोकांचा मृत्यू झाला आहे. तर आणखी लोकांना शोधण्यात येत आहे.