esakal | Coronavirus:दिल्लीत आयोजित झालेली 'तबलीगी जमात मर्कज' म्हणजे काय?
sakal

बोलून बातमी शोधा

tablighi jamaat markaz information marathi

दिल्लीत तबलीगी जमातमध्ये सहभागी झालेल्या 441 जणांना कोरोनाची लक्षणे आढळली आहे. त्या सगळ्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय.

Coronavirus:दिल्लीत आयोजित झालेली 'तबलीगी जमात मर्कज' म्हणजे काय?

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

नवी दिल्ली Coronavirus : संपूर्ण देश लॉकडाउन असताना दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या एका धार्मिक कार्यक्रमादरम्यान 25 लोकांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याने खळबळ माजली आहे. तबलीगी जमात या दिल्लीतील निजाम्मुद्दीन येथे आयोजित कार्यक्रमास उपस्थित असलेल्या तसेच त्या परिसरातील सर्व नागरिकांची कोरोनासाठी तपासणी करण्यात येत आहे. दिल्लीतील तब्बल 20 हजार घरांना क्वारंटाइन करण्यात आल्याची माहिती आहे. आतापर्यंत त्याच्यातील 25 लोकांना कोरोना असल्याचे स्पष्ट झाले आहे. यातील काहीजण हैदराबादमध्ये गेले होते. त्यापैकी सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आतापर्यंत 441 जणांना लक्षणे
दरम्यान, दिल्लीत तबलीगी जमातमध्ये सहभागी झालेल्या 441 जणांना कोरोनाची लक्षणे आढळली आहे. त्या सगळ्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. त्यातील जवळपास सर्वांना कोरोनाची सर्व लक्षणे दिसत आहेत. आतापर्यंत 24 जणांच्या टेस्ट पॉझिटिव्ह आढळल्या आहेत. जमातमध्ये सहभागी झालेले आणखी किती जण पॉझिटिव्ह आहेत. याचा अंदाज लावणेही मुश्कील झाले आहे. या संदर्भात आज, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेऊन, जमातचं आयोजन करणं हे पूर्णपणे बेजबाबदारपणा होता, असं मत केजरीवाल यांनी व्यक्त केलंय.

आणखी वाचा - देशात आणीबाणी? लष्करानं दिलं स्पष्टीकरण

तबलीगी, जमात आणि मर्कज शब्दांचे अर्थ
या तीन शब्दांचे अर्थ वेगवेगळे आहेत, तबलीगी या शब्दाचा अर्थ होतो आल्लाहच्या संदेशाचा प्रसार, प्रचार करणे. तर जमात म्हणजे लोंकाचा समूह. तर ज्या ठिकाणी लोक एकत्र येतात त्या जागेला मर्कज असे म्हटले जाते. एखाद्या ठिकाणी लोक इस्लामच्या प्रसार व प्रचार करण्यासाठी एकत्र जमत असतील तर त्याला तबलीगी जमात मरकज म्हणतात. या तबलीगी जमातचे मुख्यालय हे दिल्लीत निजामुद्दीन येथे आहे, त्यांच्याकडून इस्लामच्या प्रसारासाठी काम केले जाते.

आणखी वाचा - दिल्लीत तबलीगी जमातमध्ये सहभागी झाले हजारो नागरिक; आरोग्य यंत्रणेपुढं आव्हान

तबलीगी जमात मरकज सुरुवात केव्हा झाली?
तबलगी जमातची सुरुवात 1927 साली हरीयाणातील नूंह या गावात मुहम्मद इलियास अल-कांधवली यांनी केली. त्यामागचा मुख्य उद्देश इस्लामचा प्रचार करणे हा होता. त्यानंतर 1941 पहिल्या तबलीगी जमातसाठी 25 हजार लोक एकत्र आले. त्यानंतर पूर्ण जगभरात याचा प्रसार झाला. ब्रिटिशांच्या काळात आर्य समाजाकडून धर्मांतरीत लोकांचे शुध्दीकरण करून त्यांना परत, हिंदू बनवले जात होते. त्यामुळे मौलाना इलियास कांधलवी यांनी इस्लामची शिक्षा देण्याचे काम सुरू केले, असेही सांगितले जाते.