Coronavirus :..तर दिसताक्षणी गोळ्या घालण्याशिवाय पर्याय नाही : मुख्यमंत्री

वृत्तसंस्था
Wednesday, 25 March 2020

सैन्याची लवकरच मदत घेणार 

पेट्रोल पंप बंद करण्याचा आणि रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांना रोखण्यासाठी सैन्याची मदत घेण्यासंबंधी विचार करत असल्याचे देखील सांगण्यात येत आहे. 

हैदराबाद : जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून मोठे प्रयत्न केले जात आहेत. मात्र, तरीदेखील नागरिक घराबाहेर पडतच आहेत. असे असले तरीदेखील त्यावर लगाम लावण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी एक बेजबाबदार वक्तव्य केले आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणखी २१ दिवसांसाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात येत असल्याची घोषणा केली. हे लॉकडाऊन एकप्रकारे कर्फ्यूच असेल, असेही त्यांनी सांगितले. त्यानंतरही अनेक नागरिक रस्त्यावर दिसत आहेत. परिणामी कोरोना व्हायरस पसरण्याची दाट शक्यता आहे. याच मुद्द्यावरून तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर यांनी वादग्रस्त वक्तव्य केले. ते म्हणाले, लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. मात्र, तरी देखील नागरिक सरकारच्या आदेशाचे पालन न करत घराबाहेर निघत असल्याचे दिसून आले. परंतु आता नागरिक असचं बेजबाबदारपणे वागल्यास सरकारकडे गोळी घालण्याशिवाय पर्याय राहणार नाही.

Coronavirus lockdown: Telangana CM threatens to ‘shoot at sight’ if restrictions are violated

राव म्हणाले, की अमेरिकेला लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यासाठी सैन्याची मदत घ्यावी लागली होती. त्यामुळे राज्यातही लॉकडाऊन लागू केल्यानंतर नागरिक अत्यावश्यक काम नसतानाही घराबाहेर निघत असतील तर मला 24 तास राज्यात कर्फ्यू लागू करावा लागेल. तसेच नागरिक रस्त्यावर फिरत असल्यास त्यांना दिसताक्षणीच गोळी घालण्याचे आदेश पोलिसांना देण्यास सरकारला भाग पाडू नका.

सैन्याची लवकरच मदत घेणार 

पेट्रोल पंप बंद करण्याचा आणि रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांना रोखण्यासाठी सैन्याची मदत घेण्यासंबंधी विचार करत असल्याचे देखील सांगण्यात येत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Telangana CM threatens to shoot at sight if restrictions are violated