Coronavirus : देशातील टोलवसुली बंद; गडकरींची घोषणा

वृत्तसेवा
गुरुवार, 26 मार्च 2020

केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी देशातील टोल नाक्यांवर तात्पुरत्या स्वरुपात टोल वसुली बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

नवी दिल्ली : जगभरात सध्या कोरोना व्हायरसने थैामान घातलेले आहे. तसेच, देशातही सध्या करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारनं १४ एप्रिल पर्यंत म्हणजेच २१ दिवस संपूर्ण देशात लॉकडाउन घोषित केले आहे. यादरम्यान केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी देशातील टोल नाक्यांवर तात्पुरत्या स्वरुपात टोल वसुली बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अत्यावश्यक सेवांना काम करण्यास कोणतीही अडचण येऊ नये यासाठी राष्ट्रीय महामार्गांवरील टोल बंद करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती गडकरी ट्विटरद्वारे दिली आहे. यामुळे अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांच्या वेळेचीही बचत होईल, असे ते म्हणाले. आवश्यक त्या ठिकाणी रस्त्यांच्या दुरूस्तीचं काम आणि टोल नाक्यांवरील आपात्कालिन सेवा सुरू राहणार असल्याचेही गडकरी यांनी स्पष्ट केले.

सध्या देशभरात सुरू असलेल्या लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर महामार्ग आणि त्यांच्या राज्यांच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. केवळ अत्यावश्यक वाहनांनाच ये-जा करण्याची परवानगी देण्यात आली आहे. याव्यतिरिक्त केवळ जीवनावश्यक वस्तूंची ने-आण करणारे ट्रक, सरकारी वाहनं आणि रुग्णवाहीकांनाच जाण्याची परवानगी आहे.

तातडीसाठी रिक्षा हवी आहे; मग या मोबाईलवर संपर्क साधा !

तत्पूर्वी, कोरोना व्हायरसपासून दिवसेंदिवस धोका वाढत चाललेला आहे. जगभरात कोरोनामुळे 18 हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. 175 देशांमध्ये 4 लाख 22 हजार 829 हून अधिक रुग्ण सापडलेले असताना एक आशादायक गोष्ट समोर आली आहे. ती म्हणजे, जगभरातील जवळ जवळ 1 लाख 09 हजार 102 लोकं निरोगी झाले आहेत. ही आकडेवारी काल (ता.२६) जाहीर करण्यात आली आहे. यामुळे एक आशेचा किरण तयार झाला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Temporary Suspended Toll Collection in india by Nitin Gadkari