Coronavirus : लष्कराकडून एक हजार जण ‘एअरलिफ्ट’

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 मार्च 2020

लष्कराद्वारे तयार केलेली विलगीकरण केंद्रे 
विलगीकरण केंद्र        संख्या  

मानेसर                       ४५५     पाच परदेशी
हिंडन                         ७६
घाटकोपर                    ४४
जैसलमेर                    ४८४

परदेशातून मायदेशी आलेले नागरिक
इराण -  ५८६
चीन -  २६६
जपान  -  १२४
इटली -  ८३

कोरोनाच्या मुकाबल्यास लष्करही मैदानात...
पुणे - कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी भारतीय लष्करही उपाययोजना राबवीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून वायुदलाने चीन, जपान, इटली, इराण यांसारख्या देशातून शेकडो भारतीयांना मायदेशी आणण्यात मोठी भूमिका बजावली आहे. संरक्षण मंत्रालयानेही नागरी अधिकाऱ्यांच्या मदतीसाठी सर्व संसाधने तैनात केली आहेत.

परदेशात अडकलेल्या भारतीयांना आणले मायदेशी परत
पुणे - कोरोनाच्या उद्रेकानंतर चीन, इराण, इटली आणि जपान या चार देशांमध्ये अडकलेल्या एक हजार ५९ भारतीय नागरिकांना ‘एअरलिफ्ट’ करण्यात आले. यात विशेष विमानांनी इराणमधून भारतात आणलेल्या नागरिकांची संख्या ५८६ आहे. लष्कराची तिन्ही दले, संरक्षण मंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालयाच्या संयुक्त मोहिमेमुळे हे शक्‍य झाले.  

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

परदेशातून परत आणलेल्या नागरिकांमध्ये पाच परदेशी नागरिकांचा समावेश आहे. भारतात परत आणलेल्या नागरिकांना लष्कराने तयार केलेल्या मानेसर (हरियाना), हिंडन (उत्तर प्रदेश), घाटकोपर, मुंबई आणि जैसलमेर (राजस्थान) येथील विलगीकरण केंद्रांमध्ये ठेवण्यात आले आहे. नौदलातर्फे मुंबईतील ‘आयएनएचएस अश्‍विनी’ या लष्करी रुग्णालयात विलगीकरण सुविधा सुरू करण्यात आली आहे. 

नौदलाने विशाखापट्टणममधील ‘आयएनएस विश्‍वकर्मा’ व कोचीतील नौदलाच्या दक्षिण मुख्यालयाच्या वतीने विलगीकरण केंद्र तयार करण्यावर भर दिला जात आहे. ‘आयएनएस विश्‍वकर्मा’ येथील विलगीकरण केंद्रात सुमारे २०० नागरिकांना ठेवले जाऊ शकते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A thousand people airlift from the military