Coronavirus : भारतात आणखी एका कोरोनाग्रस्ताचा मृत्यू; बाधितांची संख्या...

वृत्तसंस्था
Friday, 20 March 2020

अमेरिकेत 13 हजारांहून अधिक प्रकरणं

अमेरिकेतही कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. यातील बाधितांची संख्या मोठी आहे. आत्तापर्यंत 13 हजारांहून अधिक प्रकरणं समोर आली आहेत. 

नवी दिल्ली : जगभरात कोरोना व्हायरसच्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. या विषाणूचा फैलाव देशातही होत असून, दिल्ली, कर्नाटक आणि महाराष्ट्रात प्रत्येकी एक कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला. त्यानंतर आता पंजाबमध्येही एक रुग्ण दगावला आहे.  

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

भारतातील विविध राज्यांत कोरोनाग्रस्त रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. सध्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 195 झाली आहे. यातील 163 नागरिक भारतीय असल्याचे समोर आले आहे. इतर 32 जण परदेशी नागरिक आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिली आहे. याबाबतचे पत्रक काढण्यात आले आहे.  

महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण

भारतात 195 प्रकरणं समोर आली असून, यामध्ये 163 भारतीय नागरिक आहेत. तसेच देशात सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. याची संख्या 48 झाली आहे. दरम्यान, सर्व आकडेवारी सकाळी 9 पर्यंतची आहे. 

'निर्भया'ला मिळाला न्याय; जाणून घ्या आठ वर्षांत कधी काय घडलं!

जगभरात 10 हजार रुग्णांचा मृत्यू

कोरोना व्हायरसने बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जगभरात आत्तापर्यंत 2,45,600 प्रकरणं समोर आली असून, यामध्ये 10,048 जणांचा मृत्यू झाला. 

अमेरिकेत 13 हजारांहून अधिक प्रकरणं

अमेरिकेतही कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. यातील बाधितांची संख्या मोठी आहे. आत्तापर्यंत 13 हजारांहून अधिक प्रकरणं समोर आली आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Total 4 Peoples died in India due to Coronavirus