कोरोनाग्रस्तांच्या आकडा सहाशेच्या पार; देशात आतापर्यंत ११ जणांचा बळी 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 26 मार्च 2020

आगीसारख्या पसरणाऱ्या आणि साऱ्या जगाला विळख्यात घेणाऱ्या कोरोना साथीच्या भारतातील रुग्णांचा आकडा आज संध्याकाळपर्यंत ६०७ वर पोहोचला आहे.

नवी दिल्ली - आगीसारख्या पसरणाऱ्या आणि साऱ्या जगाला विळख्यात घेणाऱ्या कोरोना साथीच्या भारतातील रुग्णांचा आकडा आज संध्याकाळपर्यंत ६०७ वर पोहोचला आहे. आजपासून सुरू होणाऱ्या चैत्री नवरात्रोत्सवाचा रंग करोनाच्या दहशतीमुळे दिल्लीत पार फिका पडला. 

गेल्या २४ तासांत भारतावरील कोरोनाचा विळखा आणखी घट्ट होत चालला असून कालपर्यंत चारशेच्या आसपास असलेली रुग्ण संख्या आज ६००चा आकडा ओलांडून गेली. आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र १०१ आणि केरळ १०९ या राज्यांतल्या रुग्ण संख्येने शतक ओलांडले आहे. राजधानीतील करोना रस्त्यांचा आकडाही ३८ वर गेला असून तासात आणखी पाच नवे रुग्ण आढळून आले आतापर्यंत देशभरात रुग्ण बरे झाल्याचे आरोग्य यंत्रणेकडून सांगण्यात आले. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

लोकांच्या रांगा 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा करण्याच्या कालच्या आवाहनानंतर जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी बाजारांमध्ये गर्दी करणाऱ्या नागरिकांना सरकारने वस्तूंची कमतरता भासू देणार नाही असा शब्द दिला आहे. किमान दिल्लीच्या बहुतांश भागांमध्ये आज दूध भाजीपाला दुकाने दिवसभर उघडी राहिली . मात्र काल रात्री आठला सुरू झालेले पंतप्रधानांचे भाषण संपल्यावर साडेआठ नंतर दिल्लीकरांनी बाजारपेठांत वेड्यासारखी गर्दी केली होती. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी याबद्दल तीव्र नापसंती व्यक्त करून असे करणे म्हणजे पंतप्रधानांच्या आवाहनाला हरताळ फासण्याचा सारखे आहे आणि लोक डाऊनचा उद्देशच नष्ट केल्यासारखे आहे असे केजरीवाल यांनी बजावले. 

कोरोनाशी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कारवाईचे आदेश 
सोशल डिस्टन्ससिंग्स म्हणजे सामाजिक दुरावा हा करोना वरचा एकमेव उपाय असल्याचे पंतप्रधानांनी सांगूनही कारण घराबाहेर पडणार यांना दिल्ली पोलिसांनी आज जागोजागी अडवून त्यांचे घरी परत पाठवणे केली. या उपरही जे आदेश मानणार नाहीत आणि भटकण्यासाठी बाहेर पडतील अशांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश गृहमंत्रालयाने दिल्ली पोलिसांना दिले आहेत. 

मोदी आणि योगी! 
उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येत पंतप्रधानांच्या आवाहनाला हरताळ फासण्याची कृती केली. अयोध्या रामलल्ला विराजमानच्या कार्यक्रमात शेकडोंच्या गर्दीमध्ये दोन जणांमध्ये सुरक्षित अंतर ठेवण्याचे कळकळीचे आवाहन पूर्ण दुर्लक्षित केले गेले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: total number of confirmed coronavirus cases in India has crossed the 600