Coronavirus : कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ

वृत्तसंस्था
Thursday, 19 March 2020

जगभरात कोरोना व्हायरसच्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.

नवी दिल्ली : जगभरात कोरोना व्हायरसच्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. या विषाणूचा फैलाव देशातही होत असून, दिल्ली, कर्नाटक आणि महाराष्ट्रात प्रत्येकी एक कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तसेच कोरोनाची लागण झालेल्यांमध्ये काही रुग्ण भारताबाहेरील असल्याचे समोर आले आहे. 

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

जम्मू काश्‍मीर, लडाख,  केरळ येथे नव्याने रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. सध्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 166 झाली आहे. यातील 141 नागरिक भारतीय असल्याचे समोर आले आहे. इतर 25 जण परदेशी नागरिक आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिली आहे. याबाबतचे पत्रक काढण्यात आले आहे.  

महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण

भारतात 166 प्रकरणं समोर आली असून, यामध्ये 141 भारतीय नागरिक आहेत. तसेच देशात सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. याची संख्या 42 झाली आहे. दरम्यान, सर्व आकडेवारी सकाळी 9 पर्यंतची असल्याचे सांगितले जात आहे. 

Coronavirus : शालेय परीक्षांबाबतही घेण्यात आला निर्णय; आता...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Total number of confirmed COVID19 cases in India rises to 166