Coronavirus : कोरोना व्हायरस; वाचा 10 महत्त्वाचे अपडेटस् 

'टिम ई सकाळ
Saturday, 21 March 2020

भारतात आत्तापर्यंत 276 जणांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे आणि चौघांचा यात मृत्यू झाला आहे. दिल्लीजवळ नोएडा येथे आणखी एक रुग्ण सापडल्याने कोरोनाची भिती वाढत आहे. या पार्श्वभूमीवर देशात अनेक लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 मार्च रोजी जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे. 

1) नोएडात सापडला एक रुग्ण
दिल्ली जवळील नोएडाच्या एका सोसयटीत कोरोना संक्रमित व्यक्ती सापडल्यानंतर ही वसाहत पूर्णपणे साली करण्यात आली आहे. पुढील 48 तासांसाठी ही सोसायटी सील करण्यात आली आहे. नोएडामध्ये कोरोना बाधितांची संख्या 5 वर गेली आहे.

2) शुक्रवारी सर्वाधिक रुग्ण पॉझिटिव्ह 
शुक्रवारी एकूण 57 नवीन रूग्ण समोर आले आहेत. त्यात केरळमध्ये सर्वाधिक 17 जणांना लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.  

3) दवाखान्यांमध्ये सर्व तयारी 
केंद्र सरकारकडून शुक्रवारी मार्गदर्शक तत्वे जाहीर करण्यात आली आहेत. या मध्ये सर्व रुग्णालये तसेच मेडिकल कॅालेज यांना आयसोलेशनच्या सुविधा देण्यासंदर्भात सूचना केल्या गेल्या आहेत. त्याचबरोबर दवाखान्यात आलेल्या एकही संशयित रुग्ण बाहेर जाणार नाही, याची काळजी घेण्याचे आदेशही देशभरात देण्यात आले आहेत. 

4) भारतीय रेल्वेने रद्द केल्या 709 गाड्या 
शनिवारी 709 रेल्वे गाड्या या रद्द करण्यात आलेल्या आहेत. तसेच उद्या आणखी 584 गाड्या रद्द होणार आहेत. जनता कर्फ्यू  दिवशी 3700 गाड्या रद्द आहेत तर 1000 विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.

5) महाराष्ट्रातील चार शहरांत बंद सदृश्यस्थिती
कोरोना व्हायरसची सर्वाधिक लागण महाराष्ट्रात झाली आहे. एकूण 50 जणांना या व्हायरसची लागण झाली आहे.  जीवनाआवश्यक वस्तुंची दुकाने वगळता इतर, सर्व दुकाने 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे या शहरात कर्फ्यूसारखी स्थिती आहे.

वाचा - दिल्लीहून आंध्र प्रदेश संपर्क क्रांती एक्स्प्रेसने प्रवास केलेले आठ जण कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत
 

6) योगी आदित्यनाथ यांचा मंत्र्याना जनता दरबार न भरवण्याचा आदेश
उत्तर प्रदेशचे मुख्यंमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपल्या मंत्र्यांना जनता दरबारात न जाण्याचा आदेश दिले आहेत. उत्तर प्रदेशात एक कोटी 65 लाख नागरिकांना एका महिन्याचे रेशन मोफत देण्याची घोषणा योगी आदित्यनाथ यांनी केलीय. 

7) उत्तर प्रदेशमध्ये  9 जण झाले बरे 
आत्तापर्यंत उत्तर प्रदेशमध्ये 23 लोकांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. यातील 9 जण उपचाराने बरे झाले आहेत. योगी आदित्यनाथ यांनी सांगितले की उत्तर प्रदेशमध्ये आइसोलेशन वॉर्डची पुरेशी व्यवस्था करण्यात आली आहे.

8) वर्क फ्रॉम होमची मागणी 
नोएडामध्ये कोरोनाचे पाच रुग्ण समोर आल्याने तेथील प्रायव्हेट कंपन्या पूर्णपणे बंद करून वर्क फ्रॉम होमची मागणी होत आहे. काही कंपन्यानी ही सुविधा दिली आहे तर, काहींनी अजुन दिलेली नाही.

9)जनगणना आणि एनपीआरला उशीर
कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जनगणना आणि एनपीआर नोंदणीला उशीर होण्याची शक्यता दिसत आहे. जनगणना आणि एनपीआरच्या नोंदणीची सुरुवात 1 एप्रिलपासून सुरू होणार होती.

10) इटलीमध्ये बळींची संख्या 4 हजारांवर 
चीननंतर कोरोना व्हायरसने बाधित झालेल्या देशांत इटलीचा क्रमांक लागतो. आत्ता पर्यंत इटलीमध्ये 4 हजार लोकांपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे तर, 47 हजार लोक या व्हायरसने बाधित झाले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: two hundred seventy six people have been infected with Corona virus in India