Coronavirus : मोदींच्या लॉकडाउनला भाजपच्याच मुख्यमंत्र्यांचा हरताळ

वृत्तसेवा
रविवार, 29 मार्च 2020

देशभरात सध्या कोरोना वायरसच्या विषाणूंमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली होती. या काळात कुणीही घराबाहेर पडू शकणार नाही असंही त्यांनी सांगितलं होत. जे लोक जिथे आहेत तिथेच त्यांनी राहावं असं आवाहनही त्यांनी केलं होतं. त्यांच्या या आवाहनाला भाजपच्याच मुख्यमंत्र्यांनी हरताळ फासलेला पाहायला मिळत आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांनी लॉकडाउनमध्ये सुट देण्याचा निर्णय जाहीर केला.
 

नवी दिल्ली : देशभरात सध्या कोरोना वायरसच्या विषाणूंमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली होती. या काळात कुणीही घराबाहेर पडू शकणार नाही असंही त्यांनी सांगितलं होत. जे लोक जिथे आहेत तिथेच त्यांनी राहावं असं आवाहनही त्यांनी केलं होतं. त्यांच्या या आवाहनाला भाजपच्याच मुख्यमंत्र्यांनी हरताळ फासलेला पाहायला मिळत आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांनी लॉकडाउनमध्ये सुट देण्याचा निर्णय जाहीर केला.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

रावत यांनी 31 मार्चला सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत ही लोकांना सुट दिली आहे. त्यामुळे पुन्हा रस्त्यांवर गर्दी होण्याची शक्यता आहे. कोरोनाला रोखायचं असेल तर गर्दी टाळणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. मात्र लॉकडाऊनच्या घोषणेनंतर दिल्लीत आणि मोठ्या शहरांमध्ये काम करणारे उत्तर प्रदेशमधले कामगार मोठ्या प्रमाणावर आपल्या गावी परतत आहेत. सध्या बसेस आणि रेल्वे बंद असल्याने त्यांना जाण्याची काहीही सोय नाही. ते अडकून पडले असून रस्त्यांवरून लोकांचे जत्थे पायीच निघाले आहे. त्यामुळे या लोकांची सोय व्हावी यासाठी ही सुट देण्यात येत असल्याचं रावत यांचं म्हणणं आहे.

Coronavirus : भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या १०००च्या पार; तर बळींचा आकडा...

परंतु, यामुळे आता कोरोना व्हायरस पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. देशात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहेत. यात महाराष्ट्र आणि केरळ सर्वात आघाडीवर आहेत. सरकार आणि सगळ्यांनाच चिंता होती कम्युनिटी लागण होण्याचे आता संकेत मिळू लगाल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. मात्र, सरकारकडून त्याबाबत अधिकृतरित्या काहीही स्पष्ट पणे सांगितलं गेलं नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Uttarakhand to relax lockdown on March 31