
- नमाज सुरु ठेवा
- सुमारे 9 हजार जणांची उपस्थिती
- तमिळनाडूतील सर्वाधिक नागरिक
नवी दिल्ली : कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले असून, रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. या व्हायरसचा फैलाव कसा रोखता यावा, यासाठी सरकारकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. असे असताना राजधानी दिल्लीत निजामुद्दीन दर्गा येथे तबलिगी जमात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.
बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
जगभरात कोरोनाचे सावट असताना तबलिगी जमात या कार्यक्रमामुळे चिंतेत आणखीन भर पडली आहे. या कार्यक्रमाला बहुसंख्य लोकांची उपस्थिती होती. देशातील नव्हेच तर काही परदेशी लोकांनीही हजेरी लावली होती. त्यामुळे कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होणार असल्याची शक्यता सध्या व्यक्त केली जात आहे. तसेच गृहमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, या परिषदेमुळे सुमारे 9 हजार लोकांना कोरोना व्हायरसची लागण होण्याचा अंदाज आहे.
नमाज सुरु ठेवा
नमाज सुरू ठेवा आणि मर्काझमध्ये सामील व्हा. आता ही वेळ अल्लाहची क्षमा मागण्याची आहे. मौलाना यांनी लोकांनी मशिदीत येत राहावे, असे आवाहन एका ऑडिओ क्लिपद्वारे केले जात आहे. मात्र, हा ऑडिओबाबतची सत्यता अद्याप स्पष्ट झाली नाही.
सुमारे 9 हजार जणांची उपस्थिती
तबलिगी जमात या कार्यक्रमाला सुमारे 9 हजार जणांची उपस्थिती असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. यामध्ये 7600 भारतीय आणि 1300 परदेशी नागरिक उपस्थित होते, असा संशय आहे.
तमिळनाडूतील सर्वाधिक नागरिक
तबलिगी जमात या कार्यक्रमाला तमिळनाडूतील सर्वाधिक अशा 190 नागरिक उपस्थित होते. त्यानंतर आंध्रप्रदेश 71, दिल्ली 53, तेलंगणा 28, आसाम 13, महाराष्ट्रात 12, अंदमान 10, जम्मू-काश्मीर 6, गुजरात आणि पुडुचेरीमधील प्रत्येकी एक नागरिक उपस्थित होता. यातील सर्वांचा आता शोध घेण्याचे काम सुरु आहे.