esakal | 'तबलिगी'च्या तरुणाला मारहाण; उपचारादरम्यान मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

'तबलिगी'च्या तरुणाला मारहाण; उपचारादरम्यान मृत्यू

तरुणाला शेतात नेऊन मारहाण

- रुग्णांच्या संख्येत वाढ

'तबलिगी'च्या तरुणाला मारहाण; उपचारादरम्यान मृत्यू

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील निजामुद्दीन येथे 'तबलिगी जमात'कडून एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याच कार्यक्रमात उपस्थित असलेल्या काहींकडून कोरोनाचा फैलाव होत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यातूनच आता दिल्लीच्या बवानामध्ये एका २२ वर्षीय तरुणाला जबर मारहाण केली. त्यामध्ये या तरुणाचा मृत्यू झाला. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोना व्हायरसचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे. दिल्लीतील निजामुद्दीन कार्यक्रमाकडे कोरोनाचा प्रसार केल्याचा अंदाज बांधला जात आहे. त्यामुळे कोरोना पसरवल्याचा कट रचल्याच्या आरोपातून या तरुणाची हत्या करण्यात आली. हा तरुण बवानाच्या हरेवली गावचा रहिवासी होता. हा तरुण तबलिगी जमातच्या एका कार्यक्रमासाठी मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये गेला होता.

दरम्यान, हा तरूण गावात पोहोचल्यानंतर काही जणांनी त्याच्याबद्दल अफवा पसरवली. तो कोरोना विषाणूचा फैलाव करण्याच्या हेतूने योजना आखून गावात परतल्याची अफवा गावभर पसरली, अशी माहिती पोलिसांनी दिली.

तरुणाला शेतात नेऊन मारहाण

या तरुणाला रविवारी काही जणांनी शेतात नेले होते. तिथे त्याला जबर मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्याचा मृत्यू झाला. 

रुग्णांच्या संख्येत वाढ

देशात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. यातील बहुतांश प्रकरणं तबलिगी जमात कार्यक्रमात उपस्थितांकडून झाल्याचे सांगितले जात आहे. तसेच या कार्यक्रमात हजर असलेल्या काहींना कोरोनाची लागण झाल्याची माहिती आहे.

loading image
go to top