महत्त्वाचं :: कोरोनाच्या काळात बाहेरून काही मागवतायत ? हे नियम पाळाच...

टीम ई-सकाळ
Wednesday, 8 April 2020

आरोग्य संघटना लोकांना वेळोवेळी हात स्वच्छ धुण्याचा संदेश देतात पण, घरपोच डिलिव्हर केलेल्या खाद्यपदार्थांना हाताळण्याबाबत योग्य माहिती सहज उपलब्ध नसल्याचे आढळते.

दोन आठवडे क्वारंटाइनमध्ये राहिल्यावर आपल्या सर्वांनाच हे लक्षात आले आहे की, जीवघेण्या कोरोना व्हायरसपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी घरात राहणे व स्वच्छता बाळगणे, हे अधिकाधिक महत्त्वाचे आहे. शिवाय, सध्याच्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी सर्वांनीच आपले दैनंदिन जीवन बदलले आहे. जसे की बाहेरून आवश्यक वस्तू आणताना अधिक काळजी घेणे, विशेषतः घरपोच डिलिव्हर केलेल्या खाद्यपदार्थांची दक्षता घेणे. हा व्हायरस पसरण्यापासून रोखण्यास, बाहेरून आणलेली प्रत्येक वस्तू घरात आणण्यापूर्वी, ती सॅनिटाइज केल्याची काळजी घेणे अतिशय आवश्यक आहे. अनेक आरोग्य संघटना लोकांना वेळोवेळी हात स्वच्छ धुण्याचा संदेश देतात पण, घरपोच डिलिव्हर केलेल्या खाद्यपदार्थांना हाताळण्याबाबत योग्य माहिती सहज उपलब्ध नसल्याचे आढळते.

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

घरपोच डिलिव्हर केलेल्या खाद्यपदार्थांची दक्षता कशी घ्यावी हे माहित नसल्यामुळे बाहेरून जेवण ऑर्डर करण्याबद्दल अनेकांच्या मनात संकोच असू शकतो. पण योग्य ती दक्षता घेतल्यास या परिस्थितीतही पूर्वीप्रमाणे खाद्यपदार्थ ऑर्डर करणे शक्य आहे. हा विषाणू पसरण्यापासून रोखण्यास घरी डिलिव्हर केलेल्या खाद्यपदार्थांना कशाप्रकारे अनपॅक करावे हे जाणून घ्या. चला, योग्य माहिती पुरवून, लोकांच्या मनात असलेले फूड डिलिव्हरीसंबंधीचे गैरसमज दूर करूया.

Image may contain: indoor

Image may contain: one or more people

घराबाहेर जाऊन खाद्यपदार्थ विकत घेण्यापेक्षा घरी ऑर्डर करणे अधिक सुरक्षित आहे कारण बाहेर गेल्यास विषाणू व जंतूंच्या संपर्कात येण्याची शक्यता अधिक आहे. तसेच खाद्यपदार्थ अनपॅक करताना व ते स्वच्छ करताना योग्य ती दक्षता घेणेही तेवढेच अनिवार्य आहे.

आणखी वाचा - जपानने खूप उशीर केला; आता घेतला महत्त्वाचा निर्णय

प्रतिष्ठित रेस्टोरंट्स व खाद्यपदार्थांची दारोदारी डिलिव्हरी करणार्या् कंपन्यांनी विविध आरोग्यासंबंधित दक्षतेचे पालन करून त्यांच्या ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी एक महत्त्वाचा मार्ग अवलंबला आहे. स्वच्छता बाळगून अन्न तयार करणे, ताजे अन्न शिजवणे, शेफ्सनी उपकरणांसंबंधी घेतलेली दक्षता, डिलिव्हरी कर्मचार्यां चे प्रशिक्षण, कॉन्टॅक्ट-लेस डिलिव्हरी (कमीत कमी स्पर्श होईल याची काळजी घेऊन केलेली डिलिव्हरी), अशा काही महत्त्वाच्या गोष्टींचे विविध रेस्टोरंट्सच्या मालकांनी पालन केले आहे. आणि म्हणूनच अन्न दूषित होण्याची शक्यता अगदी कमी आहे यात कोणतीही शंका नाही.

आणखी वाचा - कोरोनामुळं मुकेश अंबानींना बसतोय मोठा फटका!

अन्न घरपोच डिलिव्हर केलेल्या कर्मचार्यां शी कोणत्याही प्रकारचा संपर्क होणार नाही याची दक्षता बाळगावी. फूड पॅकेज घरात आणताना हातात आवश्य ग्लोव्ह्ज घालावे. फूड पॅकेज टेबलावर ठेवताना, दुकानातून विकत घेतलेले जंतुनाशक वापरुन ती जागा व्यवस्थित सॅनिटाइज करावी. त्याच फडक्याने पॅकेजही स्वच्छ पुसावे. स्वच्छ व स्टेरीलाइज केलेल्या भांड्यांमध्ये पॅकेजमधील अन्न काढून ठेवल्यावर पॅकेज कचर्यााच्या कुंडीत टाकून द्यावे. त्यानंतर, 20 सेकंद हात स्वच्छ धुतल्यावर चेहऱ्याला हाताचा स्पर्श होणार नाही याची काळजी घ्यावी. हाताऐवजी घरातील चमचे-काटे वापरुन बाहेरून ऑर्डर केलेले जेवण जेवल्याचे उत्तम ठरेल. विविध अन्न सुरक्षितता संस्थांनी लोकांना दिलेल्या सल्ल्यानुसार, जेवणापूर्वी गरम व ताजे अन्न 1-2 मिनिटे गरम करून घ्यावे. बाहेरून ऑर्डर केलेले खाद्यपदार्थ काळजीपूर्वक हाताळून त्याचे सेवन केल्यास, ते ऑर्डर न करण्याचे कारणच उरणार नाही.

Coronavirus  Fight with Coronavirus


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: how to unpack home delivery food information marathi