Coronavirus : धक्कादायक ! मौलानाच्या दफनविधीसाठी तब्बल १ लाख लोक; कुठे घडली घटना?

पीटीआय
Monday, 20 April 2020

जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे संपूर्ण जग लॉकडाउन आहे. अशात लॉकडाउनचा फज्जा उडवणारी घटना बांगलादेशात या शहरात घडली आहे. सर्व देशांमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. असे असले तरी, लोकं अजूनही लॉकडाऊनकडे गांभीर्याने पाहताना दिसत नाहीत, हेच या घटनेतून समोर आले आहे. बांगलादेशात मौलानांच्या दफन विधीसाठी तब्बल 1 लाख लोकं जमले होते.

ढाका - जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे संपूर्ण जग लॉकडाउन आहे. अशात लॉकडाउनचा फज्जा उडवणारी घटना बांगलादेशात या शहरात घडली आहे. सर्व देशांमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. असे असले तरी, लोकं अजूनही लॉकडाऊनकडे गांभीर्याने पाहताना दिसत नाहीत, हेच या घटनेतून समोर आले आहे. बांगलादेशात मौलानांच्या दफन विधीसाठी तब्बल 1 लाख लोकं जमले होते.

बातम्या ऐकण्यासाटी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बांगलादेशातील ब्राह्मणबेरिया जिल्ह्यात इस्लामिक पक्षाच्या एका मौलानांच्या अंत्यदर्शनासाठी लॉकडाऊनच्या आदेशाचे उल्लंघन करत हे लोक एकत्र आले होते. शनिवारी (ता. १८) रोजी हा प्रकार घडला. या प्रकारानंतर अंत्यदर्शनासाठी उपस्थित सर्वांचा शोध सध्या वैद्यकीय कर्मचारी घेत आहेत. दरम्यान, पंतप्रधानांचे विशेष सहाय्यक शाह अली फरहाद आणि ब्राह्मणबारीया पोलिस प्रवक्ते इम्तियाज अहमद यांनी एक लाख लोकं जमल्याची माहिती दिली आहे. इस्लामिक शिक्षिक मौलाना जुबैर अहमद अन्सारी असे त्या मौलानांचे नाव आहे. त्यांच्या अंत्यसंस्काराने देशातील लॉकडाउनचे उल्लंघन केले. त्याचबरोबर एकावेळी पाचपेक्षा जास्त लोकांनी नमाज पठण करू नये, या नियमालाही पायदळी तुडवले. या घटनेमुळे नवीन कोरोना व्हायरसचा उद्रेक होण्याची भीती निर्माण झाली आहे.

हजारोंच्या संख्येने लोक ब्राह्मणबेरिया जिल्ह्यातील रस्त्यावर उतरले होते. यातील बहुतांश लोकं मौलाना जुबैर अहमद अन्सारी यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी घरातून बाहेर पडले होते. केवळ ब्राह्मणबेरिया नाही तर आसपासच्या भागातूनही लोकं अंत्यसंस्कारासाठी सामील झाले. या प्रकारानंतर येथील पोलिसांवर टीका केली जात आहे. पोलिसांवर गर्दीवर नियंत्रण ठेवू न शकल्याचा आरोप केला जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 1 Lakh People Gather for Funeral in Bangladesh, Defying Lockdown and Sparking Outbreak Fears