धक्कादायक ! अॅमेझॉन जंगलात कोरोनाचा शिरकाव; एकाचा मृत्यू

वृत्तसंस्था
Monday, 13 April 2020

जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना अॅमोझॉन जंगलातही कोरोनाने शिरकाव केला आहे. अॅमेझॉन पर्जन्यवनातील यानोमामी या आदिवासी जमातीतील १५ वर्षीय मुलाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

ब्राझिलिया: जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना अॅमोझॉन जंगलातही कोरोनाने शिरकाव केला आहे. अॅमेझॉन पर्जन्यवनातील यानोमामी या आदिवासी जमातीतील १५ वर्षीय मुलाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या कोरोनाबाधित मुलाला उपचारासाठी बोआ व्हिस्टा येथील आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. संबंधित प्रजातीमधील हा मुलगा करोना संसर्गाचा पहिलाच रुग्ण होता. या जमातीमध्ये संसर्ग फैलावला असण्याची भीती आता व्यक्त होते आहे. संबंधित मुलाला करोना संसर्ग झाल्याचे गेल्या आठवड्यात स्पष्ट झाले होते.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

त्याच्या आजाराचे योग्य वेळेत निदान न झाल्याचा आणि उपचारास विलंब केल्याचा आरोप हुटुकारा संघटनेने केला आहे. हा मुलगा लक्षणे दिसू लागल्यानंतर बऱ्याच जणांच्या संपर्कात आला होता. अशा लोकांना शोधून त्यांना विलग करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ब्राझीलमध्ये सुमारे ८ लाख आदिवासी असून ३०० प्राचीन जमाती आहेत. यानोमामी ही जमात रंगवलेले चेहरे आणि शरीरावर अनेक ठिकाणी केलेले पीअर्सिंग या वैशिष्ट्यांवरून ओळखली जाते.

Coronavirus : डॉक्टर, नर्सेसना गुगलकडून थँक्यू; बनवले खास डूडल

दरम्यान, ब्राझीलमध्ये कोरोनाच्या संसर्गाने आतापर्यंत एक हजारहून अधिकजणांचा मृत्यू झाल्याची माहिती वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने दिली असून २१ हजार जणांना करोनाची बाधा झाली आहे. अॅमेझॉनच्या जंगलातील दुर्मिळ आदिवासी प्रजातींमध्ये करोनाचा संसर्ग पोहचल्यामुळे अभ्यासक, पर्यावरणवाद्यांनी चिंता व्यक्त केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 15-year-old boy from Amazon tribe dies of coronavirus​