Coronavirus : कोरोनाग्रस्तांचा आकडा 22 लाख पार; अशी आहे जगातील स्थिती!

वृत्तसंस्था
Saturday, 18 April 2020

- जगभरात 22,51,770 कोरोनाबाधित 

- अमेरिकेत कोरोनाबाधितांचा आकडा सात लाखांवर

नवी दिल्ली : जगभरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आता अमेरिका, स्पेन, भारत, इटली, चीनसह इतर अनेक देशांत कोरोना व्हायरस धुमाकूळ घालत आहे. अमेरिकेत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या सर्वाधिक असल्याची माहिती समोर आली आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

संपूर्ण जगात कोरोनाचा फैलाव झपाट्याने होत आहे. यापूर्वी चीनमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांचे प्रमाण सर्वाधिक होते. त्यानंतर इटलीमध्ये याचा फैलाव मोठ्या प्रमाणात दिसून आला होता. मात्र, आता 'वर्ल्ड मीटर्स' या संकेतस्थळानुसार, या दोन्ही देशानंतर अमेरिकेत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या सर्वाधिक झाली आहे. इतर देशांच्या तुलनेत अमेरिकेत सर्वाधिक 7,10,272 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत. 

जगभरात 22,51,770 कोरोनाबाधित 

संपूर्ण जगाला कोरोनाने विळखा घातला आहे. जगभरात आत्तापर्यंत 22,51,770 रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 1,54,311 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच जगभरात 5,74,386 रुग्णांना कोरोनावरील उपचार करुन घरी सोडण्यात आले आहे.  

Fight with Coronavirus

अमेरिकेत कोरोनाबाधितांचा आकडा सात लाखांवर

अमेरिकेत सध्या 7,10,272 रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. ही संख्या चीन, इटलीच्या तुलनेत सर्वाधिक आहे. तसेच यातील मृतांची संख्या 37,175 वर गेली आहे. तर 13,509 रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याचे समोर आले आहे. यातील विशेष बाब म्हणजे 63,510 रुग्णांवर उपचार करण्यात आले.

फ्रान्समध्ये कोरोनाग्रस्त मृतांचा आकडा 18 हजार पार 

फ्रान्समध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. सध्या 1,47,969 जणांना कोरोनाची लागण झाली तर यामध्ये 18,681 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 34,420 कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यात आले असून, त्यांना घरी सोडण्यात आले. 

Coronavirus

स्पेनमध्ये वाढले कोरोनाग्रस्त रुग्ण 

कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या अनेक देशामध्ये वाढत आहे. सध्या स्पेनमध्ये 1,90,839 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर आत्तापर्यंत 20,002 रुग्णांचा कोरोनाची लागण झाल्याने मृत्यू झाला आहे. तर 74,797 जणांवर उपचार करून घरी सोडण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 2251770 Coronavirus Patients Worldwide Death toll rises above 150000