Coronavirus : पाकिस्तानला तबलिगींचा मोठा फटका; २.५लाख लोक संपर्कात

वृत्तसंस्था
Thursday, 9 April 2020

तबलिगी जमातच्या कार्यक्रमामुळे पाकिस्तान कोरोनाच्या विखळ्यात सापडला आहे. पाकिस्तानमध्ये तबलिगी जमातच्या बेजबाबदार कृत्याची टीका होत आहे.  पाकिस्तानच्या रावळपिंडी शहरात तबलिगी जमातच्या नागरिकांनी दरवर्षीचं संमेलन साजरं केलं. या संमेलनाच्या माध्यमातून ते कोरोनाचं संक्रमण वाढविण्यास कारणीभूत ठरले आहेत.

इस्लामाबाद : तबलिगी जमातच्या कार्यक्रमामुळे पाकिस्तान कोरोनाच्या विखळ्यात सापडला आहे. पाकिस्तानमध्ये तबलिगी जमातच्या बेजबाबदार कृत्याची टीका होत आहे.  पाकिस्तानच्या रावळपिंडी शहरात तबलिगी जमातच्या नागरिकांनी दरवर्षीचं संमेलन साजरं केलं. या संमेलनाच्या माध्यमातून ते कोरोनाचं संक्रमण वाढविण्यास कारणीभूत ठरले आहेत.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पाकिस्तानमधील पंजाब स्पेशल ब्रँचने म्हटले आहे की, १० मार्च रोजी तबलिगी जमातच्या संमेलनात ७० ते ८० हजार लोकं एकत्र आले होते. दरम्यान, जमातच्या व्यवस्थापकाने म्हटले की, या कार्यक्रमाला २.५ लाखांपेक्षा जास्त लोक एकत्रित आले होते. त्यामध्ये ४० देशांमधून आलेले ३ हजार नागरिक होते. पाकिस्तानमध्ये आत्तापर्यंत ४१९६ लोकांना कोरोनाचे संक्रमण असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर कोरोनामुळे ६० जणांचा मृत्यू झाला आहे. 

Coronavirus : जगभरातील कोरोनाग्रस्तांचा आकडा १५लाखांवर तर, मृत्यूंचा आकडा...

रावळपिंडी येथे जवळपास २ लाख नागरिक लॉकडाऊन असून ते घरातच आहेत. तर, तबलिग जमातच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या १०,२६३ नागरिकांना पंजाबच्या ३६ जिल्ह्यांमध्ये क्वारंटाईन करण्यात आले आहे. अद्यापही हजारो नागरिकांचा तपास सुरु आहे. पाकिस्तानमध्ये आतापर्यंत ५३९ तबलिग जमातच्या नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे उघड झाले आहे. त्यामध्ये रावळपिंडी मरकज येथील ४०४ तबलिगींचा समावेश आहे.

Coronavirus: ही व्यक्ती करणार तब्बल साडेसात हजार कोटी रुपयांची मदत

दरम्यान, पोलीस प्रशासनाच्या आवाहनानंतर, ६ दिवसांचा हा कार्यक्रम ३ दिवसात संविण्यात आला होता. त्यानंतर, अनेक नागरिक आपल्या घरी गेले, पण विदेशातून आलेले मुस्लीम येथे अडकून पडले आहेत. दरम्यान, दिल्लीच्या निजामुद्दीन येथील तब्लिगी जमातचा मरकज हा देशातील कोरोना व्हायरसचा सर्वात मोठा हॉटस्पॉट ठरल्यानंतर रावळपिंडीतील कार्यक्रमाने पाकिस्तानची मोठी डोकेदुखी वाढवली आहे. दिल्लीतील कार्यक्रमानंतर देशभरात विखुरलेल्या अनेक नागरिकांना कोरोनाची बाधा झाल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे, अनेक राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये कोरोनाग्रस्त मुस्लीमांशी संपर्कात आलेल्या नागरिकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 2.5 lakh muslims come together in pakistan increase corona tablighi jamaat program