Coronavirus : धक्कादायक ! जागा नाही म्हणून रस्त्यावर ठेवले 17 मृतदेह

वृत्तसंस्था
Thursday, 16 April 2020

कोरोना व्हायरसचा जगभरात प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. युरोपिय देशात कोरोनाने अक्षरशः थैमान घातले आहे. अमेरिकेतील परिस्थिती तर अत्यंत बिकट असून अशात अमेरिकेतील न्यू जर्सी येथे एक धक्कादायक प्रकार घडला. येथील नर्सिंग होममध्ये जागा नाही म्हणून तब्बल 17 मृतदेह रस्त्यावर ठेवल्याचे पोलिसांना आढळले आहे.

न्यू जर्सी : कोरोना व्हायरसचा जगभरात प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. युरोपिय देशात कोरोनाने अक्षरशः थैमान घातले आहे. अमेरिकेतील परिस्थिती तर अत्यंत बिकट असून अशात अमेरिकेतील न्यू जर्सी येथे एक धक्कादायक प्रकार घडला. येथील नर्सिंग होममध्ये जागा नाही म्हणून तब्बल 17 मृतदेह रस्त्यावर ठेवल्याचे पोलिसांना आढळले आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

न्यू जर्सी शहरातील पोलिसांना एका अज्ञात व्यक्तीने नर्सिंग होमच्या बाहेर शेडमध्ये मृतदेह ठेवल्याची माहिती दिली. जेव्हा पोलिस दाखल झाले तेव्हा त्यांना तब्बल 17 मृतदेह सापडले. या बातमीनंतर संपूर्ण अमेरिका हादरली आहे. राज्यातील बहुतेक नर्सिंग होममध्ये कोरोनाव्हायरसची किमान एक घटना नोंदवली जात आहे. यात न्यू जर्सीमध्ये बुधवारपर्यंत 6 हजार 815 रूग्णांना कोरोनाची लागण झाली. बुधवारी जाहीर केलेल्या आकडेवारीत 351 कोरोनाव्हायरस संबंधित मृत्यूंपैकी कमीतकमी 45 लोक वृद्ध होते.

Coronavirus : मेघालयात कोरोनाचा पहिला बळी; डॉक्टरचा मृत्यू

सध्या अमेरिकेत 28 हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. यात जगभरात 20 लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, 1 लाख 34 हजार लोकांचा कोरोनाने मृत्यू झाला. यात अमेरिका आणि युरोपात सर्वात जास्त भीषण परिस्थिती आहे. तर, पोलिस प्रमुख एरिक सी. डॅनिअलसन यांनी, लोकांचा मृत्यू होत आहेत. हे मृतदेह कोणी ठेवले याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

दरम्यान, अमेरिकेत करोनाबाधितांचा आकडा सातत्याने वाढत आहे. अमेरिकेत सध्या 6 लाखांहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 27 हजार जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. युरोपिय देशांमध्येही परिस्थिती वेगळी नाही. स्पेन, इटली, फ्रान्स या देशांतही कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: After Anonymous Tip 17 Bodies Found at Nursing Home Hit by Virus