Coronavirus : लॉकडाऊन हटवला की पुन्हा पसरला कोरोना; चीनमध्ये २५३ नवे रुग्ण

वृत्तसंस्था
Tuesday, 14 April 2020

 लॉकडाऊन हटविल्यापासून तीन दिवसांत २५३ नवीन पॉजिटिव्ह रुग्ण सापडले आहेत.

वुहान : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव संपूर्ण जगात वाढला आहे. अशा परिस्थितीत बहुतेक देशांमध्ये लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. असे असताना चीनमध्ये मात्र हळूहळू निर्बंध हटविले जात आहेत. एकीकडे चीनमध्ये लॉकडाऊन हटवल्यानंतर लोकांचे जीवन पुन्हा रुळावर येत आहे. तर दुसरीकडे धक्कादायक बाब म्हणजे चीनमध्ये कोरोना पुन्हा पाय पसरू लागला आहे. लॉकडाऊन हटविल्यापासून तीन दिवसांत २५३ नवीन पॉजिटिव्ह रुग्ण सापडले आहेत.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाच्या म्हणण्यानुसार, रविवारी येथे १०८ नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर शनिवारी ९९ आणि शुक्रवारी ४६ नवीन रुग्णांची नोंद झाली. म्हणजे ०३ दिवसांत चीनमध्ये २५३ नवीन रुग्ण आढळून आले. यातील १० रुग्ण हे परदेशातून पुन्हा मायदेशी परतलेले आहेत. तर, 7 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण हे हेलोंगजियांगमधून आलेले आहेत, जे रशियाच्या सीमेलगत आहे. याआधी चीन-रशिया सीमा बंद करण्यात आली होती. मात्र, लॉकडाऊन हटवल्यानंतर तेथे अडकलेल्या लोकांना पुन्हा मायदेशी आणण्यात आले. चीनच्या शांघाय येथे रशियातून आलेल्या विमानातील 51 चिनी नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आढळले. अशा 21 कोरोना रूग्णांची खात्री झाली आहे की हेलोंगजियांग प्रांतातील आहेत.

Coronavirus : यापेक्षा मोठी देशभक्ती नाही; सोनिया गांधीचा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर

वुहानमधील अधिकाऱ्यांनी यापूर्वीच निर्बंध रद्द केले आहेत, परंतु हार्बिन तसेच सीमा शहर सुफिनामध्ये वुहानप्रमाणे लॉकडाऊन केले गेले आहे. फेब्रुवारीमध्ये रशियाने चीनकडे जाण्यासाठी सर्व उड्डाणे थांबविल्यामुळे, लोकांसाठी चीनकडे परत जाण्यासाठी सूफिन हा एक प्रमुख मार्ग बनला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: After lifting lockdown in china coronavirus cases rising again