Coronavirus : युरोपमध्ये असा पसरला कोरोना व्हायरस; ऑस्ट्रियाच्या रिसॉर्टचं दुर्लक्ष

वृत्तसंस्था
मंगळवार, 24 मार्च 2020

१३ मार्चला रिसॉर्ट करण्यात आले बंद

- शेकडो पर्यटकांमध्ये दोघांना लागण

- डेन्मार्कमध्येही कोरोनाग्रस्तांची संख्येत वाढ

विना : जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी अनेक देशांकडून प्रयत्न केले जात आहेत. असे असताना मात्र, ऑस्ट्रियामध्ये एक वेगळाच प्रकार समोर आला आहे. त्यामुळे संपूर्ण युरोपात कोरोना व्हायरस पसरला आहे.

बातम्या वाचण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

चीन, इराण, इटली, अमेरिका, भारतासह अनेक देशांत कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. आतापर्यंत काही रुग्णांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे.  तर कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. उत्तर प्रदेशात 30 लोक कोरोना संक्रमित आहेत. दिल्लीत 29 लोकांना याची बाधा झाली असून, एकाचा मृत्यू झाला आहे. गुजरातमध्ये 29 संक्रमित असून, एकाचा मृत्यू झाला आहे. हिमाचलमध्येही 3 संक्रमित असून, एकाचा मृत्यू झाला आहे.

एकीकडे यावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला जात आहे तर दुसरीकडे ऑस्ट्रियातील स्की रिसॉर्ट हे युरोपमध्ये कोरोना व्हायरस पसरण्याचे मुख्य कारण बनले आहे. इश्गल येथील आलेल्या पर्यटकांच्या माध्यमातून संपूर्ण युरोपमध्ये कोरोना व्हायरस पसरला आहे.

सूचनेकडे दुर्लक्ष

युरोपमध्ये दरवर्षी ५ लाखांहून अधिक पर्यटक येत असतात. त्यामुळे त्यादृष्टीने खबरदारी घेणे गरजेचे होते. तसेच आईसलँडने ऑस्ट्रियाला तशा सूचनाही केल्या होत्या. मात्र, त्याकडे ऑस्ट्रियाच्या रिसॉर्टने दुर्लक्ष केले. त्यामुळे संपूर्ण युरोपात कोरोना व्हायरस सध्या पसरला आहे.

१३ मार्चला रिसॉर्ट करण्यात आले बंद

कोरोना व्हायरचा धोका लक्षात घेता १३ मार्चला रिसॉर्ट बंद करण्यात आले होते. मात्र, तोपर्यंत संपूर्ण युरोपमध्ये भयानक परिस्थिती निर्माण झाली होती.

आम्ही खबरदारी घेतली

कोरोनाचा वाढता धोका आणि त्याचा वाढता प्रादुर्भाव पाहता ऑस्ट्रिया सरकारकडून आवश्यक ती पावले उचलल्याचे सांगण्यात आले.

क्वारंटाईन रुग्ण म्हणतो...

क्वारंटाईनमध्ये असलेला ५६ वर्षीय हेनरिक याने सांगितले, की इश्गलच्या किट्जलॉककच्या एका रेस्टॉरंटमध्ये आम्ही थांबलो होतो. तीन आठवड्यांच्या सुट्यांमध्ये गेल्या काही रात्री पार्टी सुरु आहे. तिथं अनेक लोकं होती. काही वेटर्स दारू देत होते. जेव्हा ते परतले तेव्हा त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजले.

शेकडो पर्यटकांमध्ये दोघांना लागण

या ठिकाणी शेकडो पर्यटक होते. मात्र, या सर्वांमध्ये दोघांना याची लागण झाली होती. त्यानंतर ४ मार्चला आईसलँडच्या काही नागरिकांना कोरोनाची लागण झाली. तरीदेखील येथील पर्यटन व्यवसाय सुरुच होता. १३ मार्चपर्यंत असेच सुरु राहिले. त्यानंतर हे रिसॉर्ट बंद करण्यात आले. यातील २० जणांना क्वारंटाईन करण्यात आले.

डेन्मार्कमध्येही कोरोनाग्रस्तांची संख्येत वाढ

डेन्मार्कमध्येही आकडा वाढला कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. डेन्मार्क येथे १४०० प्रकरणं समोर आली आहेत. यामध्ये २९८ नागरिकांना ऑस्ट्रियातील संक्रमित आहे. ६१ प्रकरणं इटलीशी संबंधित आहे. २० मार्चला आयस्लँड सरकारने सांगितले, की त्यामुळे ८ लोकांना याची लागण झाली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: An Austrian Resort Helped Coronavirus Spread Across Europe And Ignored Iceland Warning