Coronavirus : देव कोरोनापेक्षा मोठा आहे, असं म्हणणाऱ्या धर्मगुरुचाच कोरोनामुळे मृत्यू

वृत्तसंस्था
Wednesday, 15 April 2020

देव कोरोनापेक्षा मोठा आहे असं म्हणणाऱ्या ख्रिश्चन धर्मगुरुचाच कोरोनामुळे मृत्यू झाल्याची घटना अमेरिकेत घडली आहे. या धर्मगुरुंनी लॉकडाउनच्या नियमांचे उल्लंघन करुन सार्वजनिक प्रार्थना सभा घेतली होती.

व्हर्जिनिया : देव कोरोनापेक्षा मोठा आहे असं म्हणणाऱ्या ख्रिश्चन धर्मगुरुचाच कोरोनामुळे मृत्यू झाल्याची घटना अमेरिकेत घडली आहे. या धर्मगुरुंनी लॉकडाउनच्या नियमांचे उल्लंघन करुन सार्वजनिक प्रार्थना सभा घेतली होती. अमेरिकेतील व्हर्जिनिया येथील हे ६६ वर्षीय ख्रिश्चन धर्मगुरु आहेत. व्हर्जिनियामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव होत असल्याने लॉकडाउनची घोषणा करण्यात आली होती. मात्र या लॉकडाउनच्या नियमांचे उल्लंघन करुन या धर्मगुरुने धार्मिक उपदेश देणे सुरुच ठेवले होते. या बिशपचा कोरोनामुळे मृत्यू झाला. जेरील्ड ओ. ग्लेन असं या बिशपचं नाव आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

रिचमंड येथील न्यू डिलीव्हरन्स इव्हँजेलिस्टिक चर्चचे संस्थापक आणि मुख्य धर्मोपदेशक असणाऱ्या बिशप जेरील्ड यांनी चर्चमध्ये २२ मार्च रोजी सार्वजनिक प्रार्थना सभेचे आयोजन केले होते. यावेळेत त्यांनी आपण अशा प्रकारच्या प्रार्थना सभा घेणे सुरुच ठेवणार आहोत असं म्हटलं होतं. इतकच नाही तर मी तुरुंगात किंवा रुग्णालयात जाईन पण अशाप्रकारच्या सार्वजनिक प्रार्थना सभा घेत राहीन, असंही जेरील्ड यांनी म्हटलं होतं.

जागतिक आरोग्य संघटनेला अमेरिकेचा दणका; घेतला मोठा निर्णय

व्हर्जिनिया सरकारने जारी केलेल्या लॉकडाउनच्या नियमांचे उल्लंघन करुन या सभेचे आयोजन करण्यात आलं होतं. येथील स्थानिक राज्य सरकारने जारी केलेल्या निर्देशांनुसार १० पेक्षा अधिक लोकांना एका ठिकाणी जमा न होण्याचे आवाहन करण्यात आलं होतं. देव हा या भयभीत कऱणाऱ्या कोरोनापेक्षा मोठा आहे असा माझा ठाम विश्वास आहे, असे जेरील्ड यांनी म्हटले होते. तसेच, जेरील्ड यांनी आपण करत असलेले काम हे अत्यावश्यक सेवा असल्याचेही म्हटले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bishop who said God is larger than Covid-19 has died from the disease

Tags
टॉपिकस
Topic Tags: