Coronavirus : 'मोदीजी म्हणजे हनुमान; त्यांनी जगाला संजीवनी बुटी दिली'

वृत्तसंस्था
Wednesday, 8 April 2020

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे हनुमान आहेत. त्यांनी जगाला संजीवनी बुटी दिली असल्याचे मत ब्राझीलचे पंतप्रधान जैअर बोल्सनारो यांनी केले आहे.

नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे हनुमान आहेत. त्यांनी जगाला संजीवनी बुटी दिली असल्याचे मत ब्राझीलचे पंतप्रधान जैअर बोल्सनारो यांनी केले आहे. साऱ्या जगात थैमान घालणाऱ्या कोरोनावर अद्यापही ठोस उपाय सापडलेला नाही आहे. मात्र मलेरियासाठी वापरे जाणारे हायड्रोक्सीक्लोरोक्वीन हे औषध सध्या गेमचेंजर ठरत आहे. भारताकडे या औषधाचा साठा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे, इतर देशांकडून याची मागणी वाढत आहे. ब्राझीलच्या पंतप्रधानांनी हुनमान जयंतीचे औचित्य साधत मोदी हनुमान असून, त्यांनी जगाला संजीवनी बुटी दिली आहे, असे म्हटले आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ब्राझीलचे पंतप्रधानांनी मोदींचे पत्राद्वारे कौतुक केले आहे. त्यांनी, "संजीवनी बूटी आणून हनुमानजींनी भगवान रामाचे बंधू लक्ष्मण यांचे प्राण वाचवले, त्याचप्रमाणे भारताने दिलेली औषधी लोकांचे जीवन वाचवेल", असे सांगितले. तसेच, भारत आणि ब्राझील एकत्र या आपत्तीचा सामना करण्यास सक्षम असतील. कोरोना संसर्गाच्या उपचारात फायदेशीर असलेल्या हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनला अमेरिकेसह जगभरातून मागणी आहे.

Coronavirus : कोरोनाची सुरुवात झाली त्या चीनची सध्या काय आहे परिस्थिती?

तत्पूर्वी, भारताने १४ औषधांच्या निर्यातीवरील बंदी हटवली. पॅरासिटामॉल आणि हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषध परवाना श्रेणीमध्येच आहेत. मात्र त्यांच्या मागणीवर सतत नजर ठेवले जाईल. परंतु, मागणीनुसार पुरवठा होत असल्यास काही प्रमाणात निर्यात करण्यास परवानगी दिली जाऊ शकते, असे सांगण्यात आले आहे. जगात थैमान घालणाऱ्या कोरोनाने तब्बल २०५ देशांत वेगाने पसरत आहे. अमेरिका, इटली, स्पेन सारख्या विकसनशील देशांनीही या विषाणूचा मोठा फटका बसला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Brazil President References Ramayana While Urging India To Release Drug