Coronavirus : 'कोरोना'चे थडगे बांधल्याचा चीनचा दावा

पीटीआय
मंगळवार, 24 मार्च 2020

एकीकडे ‘कोरोना’चा फैलाव रोखण्यासाठी जगभर लढा सुरू आहे. दुसरीकडे चीनने कोविड १९ चे थडगे बांधल्याचा दावा सोमवारी केला. वुहानमधील ११ दशलक्ष नागरिकांवरील बंदीही उठविली आहे. २३ जानेवारीपासून नागरिक लॉकडाउनमध्ये होते.

वुहानमधील बंदी अखेर उठवली
बीजिंग - एकीकडे ‘कोरोना’चा फैलाव रोखण्यासाठी जगभर लढा सुरू आहे. दुसरीकडे चीनने कोविड १९ चे थडगे बांधल्याचा दावा सोमवारी केला. वुहानमधील ११ दशलक्ष नागरिकांवरील बंदीही उठविली आहे. २३ जानेवारीपासून नागरिक लॉकडाउनमध्ये होते.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

वुहानमध्ये गेल्या पाच दिवसांत एकही कोरोनाचा रुग्ण आढळला नाही, त्यामुळे बंधने शिथिल करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगानेही वुहानमध्ये रुग्ण आढळला नसल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. परंतु, परदेशातून आलेले ३९ जण बाधित असल्याचे सांगितले. संसर्ग फैलावू नये, यासाठी त्यांना सक्‍तीच्या होम कॉरंटाइनचे आदेश दिले आहेत. दरम्यान, देशातील मृतांचा आकडा ३ हजार २७० वर पोचला आहे. त्यामध्ये रविवारी मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ९ होती. दुसरीकडे ८१ हजार ९३ जण अजूनही बाधित आहेत. ५ हजार १२० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ७२ हजार ७०३ जण बरे झाले असून त्यांना घरी सोडले आहे. 

Coronavirus : अमेरिका-फ्रान्सलाही धक्का

पंतप्रधान ली केगिंयाग यांना वुहानसह देशातून विषाणूंचा नायनाट केला जाईल, असा विश्‍वास वाटतो. वुहान मधून विषाणू नाहीसा झाला असला तरी त्याचा धोका कायम आहे. परंतु, अशा परिस्थितीत डोके शांत ठेवून त्याचा मुकाबला करायला हवा, असा सल्ला देण्यात आला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: China claims to have built Corona tombs

टॅग्स
टॉपिकस