चीनमधील कोरोनाग्रस्त रुग्णांचा खरा आकडा समोर; 84 हजार नाही तर...

वृत्तसंस्था
Saturday, 16 May 2020

चीनमध्ये एकूण 6.4 लाख नागरिकांना लागण

- तारखेनुसार सविस्तर माहिती 

बीजिंग : कोरोना व्हायरसने संपूर्ण जगभरात थैमान घातले आहे. चीनच्या वुहान शहरातून सुरू झालेला कोरोना व्हायरसचा संसर्ग अद्याप कमी होताना दिसत नाही. अमेरिका, भारतासह इतर देशांत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, चीनमधील कोरोनाबाधितांचा खरा आकडा अद्याप समोर आलेला नाही. पण आता चीनचा डाटा लीक झाल्याने याबाबतची खरी माहिती समोर आली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जगभरात आत्तापर्यंत 46 लाखांहून अधिक नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर यामध्ये 3,08,923 कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांपासून चीनसोडून इतर काही देशांतील कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे.

China coronavirus

कोरोनाबाधितांची खरी संख्या चीन लपवत असल्याचा दावा गेल्या काही दिवासंमध्ये वारंवार करण्यात येत आहे. मात्र, त्याबाबत कोणतीही ठोस माहिती समोर आली नव्हती. परंतु आता चीनच्या संरक्षण तंत्रज्ञान विद्यापीठातूनच एक डेटा लीक झाला आहे. या डेटामध्ये चीनमधील कोरोनाग्रस्तांबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.

चीनमध्ये एकूण 6.4 लाख नागरिकांना लागण

चीनमध्ये आत्तातापर्यत 82,941 नागरिकांना कोरोनाची लागण झाली असल्याचे सांगितले जात आहे. याबाबतची अधिकृत माहिती चीनने दिली आहे. मात्र, चीनच्या राष्ट्रीय संरक्षण तंत्रज्ञान विद्यापीठमधील डाटा लीक झाला आहे. या डाटानुसार, चीनमध्ये एकूण 6.4 लाख नागरिकांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तारखेनुसार सविस्तर माहिती 

देशातील 6.4 लाख लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये कोणत्या तारखेला प्रथम रुग्ण आढळून आला होता. फेब्रुवारी ते एप्रिलपर्यंत किती जणांना कोरोनाची लागण झाली, याबाबत माहिती देण्यात आली आहे. 

Coronavirus

डाटाबाबत माहिती नाही

राष्ट्रीय संरक्षण तंत्रज्ञान विद्यापीठाने हा सर्व डाटा कसा गोळा केला, याबाबतची माहिती दिलेली नाही. मात्र, विविध सार्वजनिक संसाधनांची मदत घेत माहिती गोळा केली असल्याचा दावा विद्यापाठाकडून करण्यात येत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: China May Have 640000 COVID 19 Cases Not 84000 Data Leaked