Coronavirus : चीनच्या वुहानमधील काय आहे सद्यस्थिती? एकदा वाचा!

वृत्तसंस्था
Wednesday, 8 April 2020

लॉकडाऊनमुळे अनेक व्यवहार ठप्प

- ३३०० नागरिकांचा मृत्यू

वुहान : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव सध्या जगभरात मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. जवळपास १२ लाखांहून अधिक नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. मात्र, ज्या भागातून कोरोनाचा प्रसार प्रामुख्याने झाला त्या चीनमधील वुहान शहरातील स्थिती सध्या पूर्वपदावर येत आहे. त्या शहरातील लॉकडाऊन सध्या काढले जाणार आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

वुहान हे शहर कोरोना व्हायरसचे केंद्रस्थान बनले होते. याच शहरातून कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर या शहरासह संपूर्ण जगभरात लाखो नागरिकांना कोरोना व्हायसरची लागण झाली. कोरोनाचा संसर्ग रोखता यावा, यासाठी वुहान प्रशासनाकडून ७६ दिवसांचे लॉकडाऊन करण्यात आले होते. मात्र, आता तेथील परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याने लॉकडाऊन हटवण्यात आले आहे. आता आज (बुधवार) मध्यरात्रीनंतर शहरातील नागरिकांना लॉकडाऊनपासून मुक्ती मिळणार आहे. 

 Wuhan

३३०० नागरिकांचा मृत्यू

वुहान हे शहर कोरोना व्हायसरचे केंद्रस्थान बनले आहे. या शहरातील सुमारे ३३०० नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तर ८२ हजारांहून अधिक नागरिकांना कोरोनाची लागण झाली. मात्र, गेल्या काही आठवड्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्येत वाढ झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. तसेच मंगळवारी जी आकडेवारी जाहीर करण्यात आली त्यामध्ये कोरोनाचा एकही रुग्ण मिळाला नाही. 

Maharashtra News |

लॉकडाऊनमुळे अनेक व्यवहार ठप्प

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. त्यामुळे सर्वच व्यवहार ठप्प होते. तसेच नागरिकांनाही घराबाहेर पडण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली होती. फक्त जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी बाहेर जाण्याची मुभा देण्यात आली होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chinas coronavirus pandemic epicenter Wuhan ends 76 day lockdown