'एआय'द्वारे उलगडणार कोरोनाचे रहस्य

पीटीआय
Thursday, 30 April 2020

कृत्रिम बुद्धीमत्तेचेच्या (एआय) तंत्राचा वापर करून कोरोनाच्या विषाणूचा जनुकीय आराखडा तयार करण्याचे काम सध्या सुरू असून, हे संशोधन या विषाणूच्या विरोधातील लस आणि औषधांच्या निर्मितीमध्ये कळीची भूमिका बजावणार आहे. कॉनडातील वेस्टर्न ऑन्टॅरिओ विद्यापीठामध्ये याविषयाचे संशोधन सुरू असून, त्यात गुर्जित रंधावा या भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञाचाही समावेश आहे.

टोरांटो - कृत्रिम बुद्धीमत्तेचेच्या (एआय) तंत्राचा वापर करून कोरोनाच्या विषाणूचा जनुकीय आराखडा तयार करण्याचे काम सध्या सुरू असून, हे संशोधन या विषाणूच्या विरोधातील लस आणि औषधांच्या निर्मितीमध्ये कळीची भूमिका बजावणार आहे. कॉनडातील वेस्टर्न ऑन्टॅरिओ विद्यापीठामध्ये याविषयाचे संशोधन सुरू असून, त्यात गुर्जित रंधावा या भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञाचाही समावेश आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दोन मिनिटांत निदान शक्य 
कोरोनाच्या विषाणूचा त्वरित आणि सहजरित्या शोध घेण्यासाठी या संशोधनाचा वापर करण्यात येणार आहे. नव्याने उपलब्ध होणाऱ्या डेटाच्या मदतीने अवघ्या दोन मिनिटांमध्ये कोरोनाच्या विषाणूचे निदान करणे शक्य आहे, असे संशोधकांचे म्हणणे आहे.   

गृहीतकाला पाठिंबा
कोरोनाच्या साथीच्या काळात या विषाणूच्या विरोधातील उपययोजना आणि वैद्यकीय सुविधांच्या उपलब्धतेच्या नियोजनासाठी हे संशोधन लाभदायक ठरणार आहे. पीएलओएस-वन नियतकालिकामध्ये हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. वटवाघुळांमध्ये आढळणाऱ्या सार्स-कोव्ह-२ या विषाणूमुळे कोरोनाचा आजार होतो असे शास्त्रज्ञांचे गृहीतक असून, त्यास हे संशोधन पाठिंबा दर्शविते.

कोरोनाच्या विषाणूचा जनुकीय आराखडा शोधणे अत्यंत आवश्यक आहे. त्यात यश आल्यास इतर विषाणूंच्या उपलब्ध माहितीशी तुलना करून अवघ्या काही मिनिटांमध्ये अचूक निदान करता येऊ शकते. 
- प्रा. कॅथलीन हिल, वेस्टर्न ऑन्टॅरिओ विद्यापीठ

मशिन लर्निंगचा वापर
कोरोना विषाणूच्या जनुकीय आराखड्यातील २९ वेगवेगळे क्रम शोधण्यासाठी मशिन लर्निंग पद्धतीचा वापर करून शंभर टक्के अचूक निष्कर्ष प्राप्त केले जाऊ शकतात. त्याचबरोबर इतर पाच हजार विषाणूंच्या जनुकीय आराखड्याशी त्यांचा असलेला संबंधही या पद्धतीने अवघ्या काही मिनिटांमध्ये शोधणे शक्य होते, असे संशोधकांचे म्हणणे आहे.

अचूक, वेगवान यंत्रणा
कोरोना विषाणूच्या जनुकीय आराखड्यातील क्रम शोधण्यासाठी अतिवेगवान, मोजण्यास सोपी आणि अतिशय अचूक यंत्रणा विकसित करण्यात आली आहे. त्यात ग्राफिकवर आधारीत, अत्याधुनिक विशेष सॉफ्टवेअर प्रणालींचा वापर करण्यात येतो. डिसिजन-ट्री पद्धतीने ही प्रक्रिया पूर्ण केली जाते. त्यासाठी ‘एआय’च्या तंत्राचा वापर करण्यात आला असून, या माध्यमातून शक्य त्या पर्यायांमधून अधिक अचूक पर्यायाची निवड करता येते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coronas secret to be unraveled by AI