Coronavirus: इटलीत कोरोनाचे बळी वाढण्याचे कारणच वेगळे; मृतांची टक्केवारी चिंताजनक

टीम ई-सकाळ
गुरुवार, 19 मार्च 2020

देशातील गंभीर परिस्थितीचा अंदाज घेऊन, इटलीने लॉक डाऊनची मुदत वाढवून एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत नेली आहे.

रोम (इटली) Coronavirus : चीनमध्ये सर्वाधिक प्रादुर्भाव झाल्यानंतर जगात इटलीमध्ये कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला. देशाची लोकसंख्या, कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या आणि मृतांचा आकडा यात दुदैवाने इटली आघाडीवर आहे. इटलीत 4 हजार कोरोनाग्रस्त बरे झाले असली तरी, जवळपास तीन हजार जणांचा बळी गेला आहे. जगभरात एकूण 8 हजार पेक्षा जास्त कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. त्यात इटलीतील 3 हजार मृतांचा समावेश आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

इटलीतील लॉकडाऊनची मुदत वाढली
कोरोनामुळं इटलीतील मृतांची संख्या तीन हजारांवर गेली आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत मृतांमध्ये या आठवड्यात 150 टक्क्यांनी वाढ झाली आहे. इटलीतील परिस्थिती चिंताजनक असल्यामुळं आकडेवारीच्या साह्याने इटलीच्या परिस्थितीवर मात करण्याचा आरोग्य विभागाचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी मृत व्यक्तीला इतर कोणता आजार होता का? याची माहिती गोळा करण्यात आली आहे. त्यातून काही धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहेत. सध्या 35 हजार 713 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. तर, मृतांचा आकडा 2 हजार 978वर गेला आहे. या आजारातून 4 हजार 025 जण ठणठणीत बरे झाले आहेत. देशातील गंभीर परिस्थितीचा अंदाज घेऊन, इटलीने लॉक डाऊनची मुदत वाढवून एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत नेली आहे.

आणखी वाचा -  कोरोनावर इलाज होणार, लस येत आहे

टक्केवारी जास्तच
कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यासाठी दिशा मिळावी म्हणून, केलेल्या सर्वेक्षणात मृतांपैकी 48.5 टक्के जणांना तीन किंवा त्यापेक्षा अधिक इतर रोग झाल्याचे निष्पन्न झाले. 25.6 टक्के जणांना इतर दोन रोग झाल्याची माहिती मिळाली तर, 25.1 टक्के रुग्णांना एखादा रोग झाला होता. केवळ 0.8 टक्के जण असे होतो की ज्यांना इतर कोणताही आजार नव्हता आणि केवल ते कोरोनाची लागण झाल्यामुळं मृत्यूमुखी पडल्याचे स्पष्ट झाले आहे. कोरोनाची लागण झालेल्यांपैकी 75 टक्के रुग्ण हे उच्च रक्तदाबाचा त्रास असणार होते. तर, 35 टक्के जणांना मधूमेह होता, अशी माहिती आहे. इटलीत कोरोनाची लागण होऊन मृत्यू झालेल्यांची संख्या 8 टक्के आहे. ती इतर देशातील मृतांच्या टक्केवारीपेक्षा जास्त असून, चिंताजनक आहे. 

आणखी वाचा - इटलीच्या रस्त्यांवर स्मशान शांतता

कोरोनाची लागण झालेले किती? 
इटलीत कोरोनाची लागण झालेल्याची संख्या नेमकी किती यावरून संभ्रम आहे. कारण, जी व्यक्ती लक्षणे दिसल्यानंतर कोरोनाची तपासणी करण्यासाठी येते, त्यांचीच चाचणी केली जात आहे. त्यामुळं इटलीत कोरोनाग्रस्तांची संख्या जास्त असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जगभरात लागण झालेल्यांपैकी मृत होण्याचे प्रमाण केवळ 2 टक्के आहे. पण, इटलीत ही टक्केवारी प्रचंड चिंताजनक आहे. त्यामुळं जागतिक आरोग्य संघटनेसह सर्वांचच लक्ष इटलीकडं लागलंय. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus 99 percent died Italy had other diseases information marathi