Coronavirus : आफ्रिकेने आताच जागे व्हायला हवे; जागतिक आरोग्य संघटनेचे आवाहन

पीटीआय
शुक्रवार, 20 मार्च 2020

 • इजिप्तमध्ये विमानतळे बंद, उड्डाणे रद्द
 • मॉस्कोमध्ये न्युमोनियाची साथ
 • द. आफ्रिका झिम्बाब्वेच्या सीमेवर कुंपण घालणार
 • फ्रान्समध्ये अालिंगनावर बंदी
 • द. आफ्रिकेतील साठेबाजीला ऊत बाजारपेठ्या रिकाम्या
 • द. कोरियाकडून उद्योगांसाठी ३९ अब्ज डॉलर
 • श्रीलंकेतील निवडणुका पुढे ढकलल्या
 • पॅलेस्टाईनमधील कैद्यांना विषाणूचा संसर्ग
 • ब्रिटनमध्ये लष्करास सज्ज राहण्याच्या सूचना
 • जागतिक बँकेकडून मदतनिधी म्हणून चौदा अब्ज डॉलर
 • इंडोनेशिया सामूहिक प्रार्थनांवर बंदी

दुसऱ्या महायुद्धानंतरचे सर्वांत मोठे आव्हान
बर्लिन - दुसऱ्या जागतिक महायुद्धानंतर जर्मनी प्रथमच एका सर्वांत मोठ्या आव्हानाला सामोरे जात असून, या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे जर्मनीच्या चॅन्सलर अँजेला मर्केल यांनी म्हटले आहे. मर्केल यांनी आज दूरचित्रवाणी वाहिन्यांवरून देशाला उद्देशून भाषण केले. केवळ जर्मनीच्या एकीकरणापासूनच नाही तर दुसऱ्या जागतिक महायुद्धानंतरचे हे सर्वांत मोठे आव्हान आपल्यासमोर उभे ठाकले आहे, असे त्यांनी नमूद केले.

जीनिव्हा - आफ्रिका खंड हा या विषाणूच्या संसर्गापासून दूर असला तरीसुद्धा त्यांनी आतापासूनच काळजी घ्यायला हवी. भविष्यातील वाईट गोष्टींना सामोरे जाण्याची त्यांची तयारी हवी, आफ्रिकेने आताच जागे व्हायला हवे, असे आवाहन जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेडरॉस घेबरायसेस यांनी केले आहे. व्हर्च्युअल न्यूज कॉन्फरन्सच्या माध्यमातून घेबरायसेस यांनी आज जगभरातील पत्रकारांशी संवाद साधला.

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

सहारा वाळवंटीय प्रदेशातील विषाणू संसर्गाची २३३ प्रकरणे उघड झाली असून, आत्तापर्यंत केवळ चौघांचाच मृत्यू झाला आहे. अर्थात ही सरकारी आकडेवारी असून त्यातून ठोस असे चित्र स्पष्ट होत नाही. अनेक देशांमध्ये एका विशिष्ट टप्प्यावर गेल्यानंतर या विषाणूचा संसर्ग हा अधिक वेगाने होत असल्याचे दिसून आले आहे, त्यामुळे या आव्हानाला तोंड देण्यासाठी आफ्रिकेने आतापासूनच सज्ज राहायला हवे, असे त्यांनी नमूद केले.

Coronavirus : कोरोनाची लस शोधण्यात संशोधकांना यश; चाचणीत दिसले सकारात्मक परिणाम!

जागतिक आरोग्य संघटनेने हा विषाणू मानवतेचा शत्रू असल्याचे म्हटले आहे. मानवतेच्या या शत्रूविरोधात सर्वांनी एकत्र येण्याची हीच योग्य वेळ असल्याचे घेबरायसेस यांनी नमूद केले. जगातील प्रत्येक देश आणि समुदायाला या विषाणू संसर्गाचा धोका निर्माण झाला असून जागतिक आरोग्य संघटना ही दररोज आरोग्य कर्मचारी, रुग्णालयांचे व्यवस्थापक, उद्योगांचे प्रमुख आणि अन्य घटकांशी संवाद साधत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

संशोधक म्हणतात, 'कोरोना व्हायरस हा नैसर्गिकच!'

शाळा, महाविद्यालये बंद राहणार
लंडन - कोरोनाच्या संसर्गामुळे घाबरलेल्या अमेरिकेने संभाव्य आर्थिक संकटाला सामोरे जाण्यासाठी आधीपासून उपाययोजना आखायला सुरवात केली आहे. ब्रिटनमधील सर्वच शाळा, आणि विद्यापीठांमधील परीक्षा तातडीने थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लंडनमध्येही पूर्णपणे टाळेबंदी होण्याची शक्यता आहे. आत्तापर्यंत या संसर्गापासून दूर असलेल्या रशियामध्येही कोरोनाने हातपाय पसरायला सुरवात केली असून रशियातील एका ७९ वर्षांच्या वृद्ध महिलेचा संसर्गामुळे मृत्यू झाला. रशियामधील हा पहिला मृत्यू आहे. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडने त्यांच्या सीमा बंद केल्या असून परकीय पर्यटकांना पूर्णपणे प्रवेशबंदी करण्यात आली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coronavirus Africa care alert World Health organisation