Coronavirus : बोरिस जॉन्सन यांची प्रकृती स्थिर; मात्र, दुसरा दिवसही आयसीयूतच

वृत्तसंस्था
Wednesday, 8 April 2020

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांची प्रकृती स्थिर असून त्यांनी दुसरा दिवसही अति दक्षता विभागातच (आयसीयू) काढला.

लंडन : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांची प्रकृती स्थिर असून त्यांनी दुसरा दिवसही अति दक्षता विभागातच (आयसीयू) काढला. कोरोनाच्या महासंकटात जनतेसाठी लढणाऱ्या आपल्या लाडक्‍या पंतप्रधानालाच कोरोनाने झडप घातल्याने देशातील जनता चिंतेत आहे. सोमवारी जॉन्सन यांना येथील सेंट थॉमस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले होते मात्र त्यांची प्रकृती अधिक बिघडल्याने त्यांना आयसीयूत दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर ऑक्‍सिजनचा उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयाच्या प्रवक्‍त्याने सांगितले.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू असून उपचाराला प्रतिसाद मिळत आहे. ब्रिटचे परराष्ट्रमंत्री डॉमन्कीक राब यांनी जॉन्सन यांच्या प्रकृतीविषयी सांगितले, की थॉमस रुग्णालयात उत्तर डॉक्‍टरांची टीम त्यांच्या काळजी घेत असून उपचारही योग्य पद्धतीने सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीविषयी लोक चिंतेत आहेत. आता त्यांना श्‍वासोच्छवास घेण्यासही कोणती अडचण येत नाही. शनिवारी जॉन्सन हे काही टेस्ट करण्यासाठी गेले असता त्यांना कोरोनाची संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना सर्दीबरोबरच अंगात खूप ताप होता. 

Coronavirus : कोरोनाची सुरुवात झाली त्या चीनची सध्या काय आहे परिस्थिती? 

दरम्यान, ब्रिटनमध्ये आतापर्यंत कोरोनाने 6159 जणांचा मृत्यू झाला असून किमान 55 हजार नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. चीन,अमेरिका, स्पेन, इटलीपाठोपाठ लंडनमध्येही कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढत असल्याने तेथे चिंतेचे वातावरण आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coronavirus Boris Johnson spends second night in intensive care