esakal | Coronavirus : इंग्लंडचे बोरिस जॉन्सन रुग्णालयात दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

Coronavirus: Boris Johnson still in charge despite hospital admission

जगभरात सर्वत्र करोना व्हायरसनं थैमान घातलं असतानाच इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बोरिस जॉन्सन यांना काही दिवसांपूर्वी (ता. २७ मार्च) कोरोना असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यांनी ट्विटर अकाउंटवरून आपली टेस्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती सर्वांना दिली होती. त्यानंतर ते होम आयसोलेशनमध्ये होते. परंतु, आता त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Coronavirus : इंग्लंडचे बोरिस जॉन्सन रुग्णालयात दाखल

sakal_logo
By
वृत्तसंस्था

लंडन : जगभरात सर्वत्र करोना व्हायरसनं थैमान घातलं असतानाच इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बोरिस जॉन्सन यांना काही दिवसांपूर्वी (ता. २७ मार्च) कोरोना असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यांनी ट्विटर अकाउंटवरून आपली टेस्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती सर्वांना दिली होती. त्यानंतर ते होम आयसोलेशनमध्ये होते. परंतु, आता त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अनेक दिवसांनंतरही त्यांच्यात करोनाची लक्षणं दिसत असल्यानं त्यांना अखेर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल केल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली. यापूर्वी क्वीन एलिझाबेथ द्वितीय यांनी लोकांना घरात राहण्याचं आवाहन केलं होतं. आपण घरात राहिलो तर करोनाच्या प्रादुर्भावापासून लवकर आपली सुटका होऊ शकते, असं त्या म्हणाल्या होत्या. त्यांनी टिव्हीच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला होता.

धक्कादायक ! ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना कोरोनाची लागण

तर दुसरीकडे प्रिन्स चार्ल्स यांनादेखील करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. त्यांना करोनाची लागण झाल्याचं समोर आल्यानंतर त्यांना आणि त्यांच्या पत्नीला त्यांच्या स्कॉटलंड येथील घरात होम क्वारंटाइन करण्यात आलं होतं. तर युरोपात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर राणी एलिझाबेथ द्वितीय यांना बकिंगहम पॅलेसमधून विंडसर कॅसल येथे हलवण्यात आले होते.

loading image
go to top