संपूर्ण जग लॉकडाऊन; पण, चीनमध्ये पर्यटकांची झुंबड

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 7 April 2020

चीनमधील परिस्थिती आता पूर्णपणे नियंत्रणात आली असल्याने तेथील सरकारने तीन महिन्यानंतर चीनमधील लॉकडाऊन हटवले आहे. यामुळेच पर्यटक पर्यटनस्थळी गर्दी करत असल्याचे चित्र चीनमध्ये दिसत आहे. चीनमध्ये या कोरोना या प्राणघातक विषाणूने तीन हजाराहून अधिक लोकांचा बळी घेतला आणि ८० हजारांहून अधिक लोक संसर्गग्रस्त झाले होते. चीनमधून संपूर्ण जगात पसरलेल्या कोरोनाने संपूर्ण जगाला आता वेढले आहे. अशा परिस्थितीत जेव्हा संपूर्ण जग सोशल डीसस्टींग आणि लॉकडाऊनने कोरोनाला पराभूत करण्याचा प्रयत्न करीत आहे तेव्हा चीनमधील छायाचित्रांनी त्यांना आश्चर्यचकित केले आहे.

चीनमधील परिस्थिती आता पूर्णपणे नियंत्रणात आली असल्याने तेथील सरकारने तीन महिन्यानंतर चीनमधील लॉकडाऊन हटवले आहे. यामुळेच पर्यटक पर्यटनस्थळी गर्दी करत असल्याचे चित्र चीनमध्ये दिसत आहे. चीनमध्ये या कोरोना या प्राणघातक विषाणूने तीन हजाराहून अधिक लोकांचा बळी घेतला आणि ८० हजारांहून अधिक लोक संसर्गग्रस्त झाले होते. चीनमधून संपूर्ण जगात पसरलेल्या कोरोनाने संपूर्ण जगाला आता वेढले आहे. अशा परिस्थितीत जेव्हा संपूर्ण जग सोशल डीसस्टींग आणि लॉकडाऊनने कोरोनाला पराभूत करण्याचा प्रयत्न करीत आहे तेव्हा चीनमधील छायाचित्रांनी त्यांना आश्चर्यचकित केले आहे. तीन महिन्यांच्या लॉकडाऊन हटवल्यानंतर चीनमधील पर्यटनस्थळांवर हजारो लोकांची गर्दी जमण्यास सुरवात झाली आहे. सरकारने इशारा देऊनही लोक पर्यटनस्थळांवर येण्याचे थांबवत नाही आहेत. आणि ही स्थिती बीजिंगपासून शांघायपर्यंत आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पर्यटकांना रोखण्यासाठी बोर्ड
चीनच्या अनहुई प्रांतातून काही छायाचित्रे बाहेर आली असून यामध्ये हजारो लोक चेहऱ्यावर मास्कलावून होंगशान माउंटन पार्कमध्ये फिरताना दिसत आहेत. बऱ्याच दिवसांच्या प्रवास बंदीनंतर हे लोक बाहेर फिरायला निघाले आहेत. कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी चीनने अनेक प्रांतात लॉकडाउन लादले होते. ग्लोबल टाईम्सच्या वृत्तानुसार, लोकप्रिय पर्यटनस्थळांवर पर्यटकांची तुफान गर्दी होत आहे आणि त्यानंतर एका दिवसात २० हजारांहून अधिक लोक एकत्र येऊ शकत नाहीत असे सूचना फलक प्रशासनाकडून लावण्यात आले आहेत.

शांघाय, बीजिंगमध्ये पर्यटकांची गर्दी
शांघायमधील प्रसिद्ध ड्रॉप वॉटरफ्रंटजवळही पर्यटकांची प्रचंड गर्दी जमलेले चित्र आता पाहायला मिळत आहे. शहरातील अनेक रेस्टॉरंट्सही उघडली आहेत आणि गर्दी इतकी वाढली आहे की त्यांनी प्री बुकिंग सुरू केले आहे. राजधानी बीजिंग देखील याबाबतीत मागे राहिली नाहीये, येथे लोक शहरातील पार्क आणि मोकळ्या जागेत एकत्र जमत गर्दी करत आहेत. बंदच्या तीन महिन्यांनंतर येथे जीवन सर्वसामान्य दिसत आहे. डिसेंबरच्या उत्तरार्धात वुहानमध्ये पहिले प्रकरण समोर आल्यानंतर चीनमध्ये मोठा बंदोबस्तासह लॉकडाऊन लावण्यात आला होता. परंतु प्रशासन आता हळू हळू बंदी उठवत आहे आणि लोकांना सामाजिक अंतर ठेवण्याचे आवाहन चीन सरकारकडून केले जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus china beijing shanghai crowded tourist places