चीनकडून पुन्हा निकृष्ठ मास्कची निर्यात; युरोपमधला हा देश ठरला बळी

वृत्तसंस्था
Friday, 10 April 2020

जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत असताना अनेक देश चीनकडून वैद्यकीय उपकरणांची मोठ्या प्रमाणावर खरेदी करत आहेत आणि चीनकडून त्यांना निकृष्ठ दर्ज्याचे उपकरणे पाठविली जात आहेत असा आरोप जगभरातून होत आहे.

जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत असताना अनेक देश चीनकडून वैद्यकीय उपकरणांची मोठ्या प्रमाणावर खरेदी करत आहेत आणि चीनकडून त्यांना निकृष्ठ दर्ज्याचे उपकरणे पाठविली जात आहेत असा आरोप जगभरातून होत आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जगभरात आता कोरोनाने मोठ्या प्रमाणावर धुमाकूळ घातला आहे. दररोज हजारो लोकांचा कोरोनामुळे मृत्यू होत आहे.अशातच चीनच्या पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट्स(पी पी ई) विषयी सतत उपकरणांची गुणवत्ता खूपच कमी आहे असे अहवाल येत आहेत, अशा तक्रारींमध्ये फिनलँडचे नावही जोडले गेले आहे. कोरोना विषाणूचा वाढता धोका लक्षात घेता फिनलँडने चीनकडून दोन दशलक्ष सर्जिकल मास्क आणि दोन लाख तीस हजार श्वासोच्छवासाचे मास्क खरेदी केले होते, परंतु त्याचे शिपमेंट आल्यानंतर एका दिवसानंतर हे उघड झाले की या शिपमेंट मध्ये पाठविलेले मास्क चांगल्या गुणवत्तेचे नाहीत. त्यांचा उपयोग डॉक्टर, परिचारिका आणि रुग्णालयांमध्ये काम करणारे इतर आरोग्य कर्मचारी करू शकत नाहीत. आरोग्य मंत्रालयाचे प्रवक्ते किर्सी वरिहेला यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे. फिनलँड यातून खूप निराश असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Coronavirus : जगभरात कोणत्या देशात किती कोरोना रुग्ण? वाचा सविस्तर बातमी

हि शिपमेंट आल्यानंतर फिनलँड सरकारचा आता विश्वास उडाला आहे. मंगळवारी फिनलँडचे आरोग्यमंत्री एनो-का इसा पेककोन यांनी चीनमधील २० दशलक्ष सर्जिकल मास्क आणि दोन लाख तीस हजार श्वासोच्छवासाचे मास्कचे एक छायाचित्र ट्विट केले, त्या ट्विटमध्ये त्यांची आशा स्पष्टपणे दिसली. मंगळवारी पहिले शिपमेंट फिनलँडमध्ये दाखल झाले असून त्यातील असलेल्या उपकरणांची गुणवत्ता खूपच कमी आहे अशातही हे जहाज परत न पाठवता स्थानिक निवासी भागात काम करणाऱ्या आरोग्य कर्मचार्यांना हे वापरण्याचा निर्णय फिनलँडकडून घेण्यात आला आहे.

जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यू एच ओ) आणि इतर देशांचे असे म्हणणे आहे की, एन-९५ मास्क फक्त डॉक्टर आणि परिचारिकांसाठी वापरावा, तर रूग्णालय बाहेर काम करणारे आरोग्य कर्मचारी इतर मास्क वापरू शकतात. या कारणास्तव, आता त्यांचा वापर फिनलँडमधील रुग्णालयाच्या बाहेर काम करणारे आरोग्य कर्मचारी करतील.
पत्रकार परिषदे दरम्यान, आणखी एक अधिकारी टॉमी लुनेमा यांनी मास्कच्या वाढत्या किंमतींवर चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की, हे लक्षात घेता सरकारला लवकरच आणखी मास्क खरेदी करावे लागतील. त्यांच्या मते ज्या देशातून त्यांचा व्यापार केला जातो त्या देशाला त्यास आगाऊ पैसे द्यावे लागतात. चीनकडून खराब मास्क घेतल्यानंतर फिनलँडला सुरक्षा उपकरणे, मास्क इत्यादींसाठी ६०० दशलक्ष युरो अतिरिक्त रक्कम जाहीर करावी लागणार आहे. कोरोना संकटाच्या परिणामास सामोरे जाण्यासाठी सरकारने चार अब्ज युरोचे बेलआउट पॅकेज दिलेल्या रक्कमेचा हा एक भाग असणार आहे.

चीनने विश्वासघात केल्यावर सरकारने स्वदेशी कंपन्यांना त्यांचे उत्पादन करण्याचे कंत्राट दिले आहे, परंतु त्यांचा पुरवठा या महिन्याच्या अखेरीसच होईल. दरम्यान, पंतप्रधान सना मरीन यांनी त्यांच्या अधिकार्यांनी वेळेवर साठा केला नाही असे ट्विट करून आपली नाराजी व्यक्त केली आहे. यासाठी त्यांनी अधिकार्यांना फटकारले आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की स्पेन, नेदरलँड्, तुर्की, नेपाळ आणि ऑस्ट्रेलिया यांनीही चीनच्या वस्तूंच्या निकृष्ट दर्जाबद्दल तक्रार केली होती. दुसरीकडे, चीन आपल्या वस्तूंबद्दल स्वच्छता देण्यासाठी सतत प्रयत्न करत आहे. युरोपमधील काही देश अमेरिकेच्या सांगण्यावरून असे प्रकार करत आहेत, असा आरोपही चीनकडून करण्यात येत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus china exports low quality masks Finland