esakal | संतापजनक : चीनकडून भारताचीही थट्टा; पाठवली निकृष्ट पीपीई किट
sakal

बोलून बातमी शोधा

coronavirus china exports low quality ppe kit India

चीनमधून लवकरच ५.५ लाख टेस्टिंग किट येत असल्याचे सूत्रांनी सांगितले. यापैकी ३ लाख जलद अँटी-बॉडी टेस्टिंग किट्स गुआंगझो वोंडफो व अडीच लाख झुहाई लिव्हझोन येथून येत आहेत.

संतापजनक : चीनकडून भारताचीही थट्टा; पाठवली निकृष्ट पीपीई किट

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

Coronavirus : जगभरात निकृष्ट दर्ज्याचे वैद्यकीय साहित्य पाठवल्याची तक्रार चीनबद्दल होत असताना चीनकडून आता भारतात सुद्धा निकृष्ट दर्ज्याचे पीपीई कीट पाठवण्यात आल्याचे उघड झाले आहे. सध्या कोरोनाचा भारतातील वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता देशातील वैयक्तिक संरक्षणात्मक उपकरणाच्या (पीपीई) अभावाच्या समस्येला सध्या तोंड द्यावे लागत आहे. या विषयाची माहिती असलेल्या एका व्यक्तीने सांगितले की, चीनमधून आयात केलेल्या वैद्यकीय उपकरणांपैकी बरीच महत्वाची साधने वापरली जात नाहीत कारण ती भारतात घेण्यात आलेल्या सुरक्षा तपासणीत अयशस्वी झाली आहेत. चीन या उपकरणांचा पुरवठा करणारा जगातील सर्वात आघाडीचा देश आहे. दरम्यान, कोरोनाच्या चाचणीसाठी चीनकडून ५.५ लाख टेस्टिंग किट येत आहेत, जे आज भारतात पोहोचण्याची शक्यता आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

चीनमधून आणखी ५.५ लाख टेस्टिंग किट येणार
चीनमधून लवकरच ५.५ लाख टेस्टिंग किट येत असल्याचे सूत्रांनी सांगितले. यापैकी ३ लाख जलद अँटी-बॉडी टेस्टिंग किट्स गुआंगझो वोंडफो व अडीच लाख झुहाई लिव्हझोन येथून येत आहेत. याशिवाय एमजीआय शेन्जेन येथून 1 लाख आरएनए एक्सट्रॅक्शन किट येत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी रात्री उशिरापर्यंत या वस्तूंसाठी कस्टम क्लीयरन्स मिळाला होता आणि आता ते विमानाने भारताला रवाना झाले आहेत.

आणखी वाचा - जपानमध्ये होऊ शकतो पाच लाख लोकांचा मृत्यू!

चीनकडून जगाची थट्टा
कोरोनाचा प्रादुर्भाव जगभरात इतक्या मोठ्या प्रमाणात वाढला असताना चीनकडून आता वैद्यकीय उपकरणांच्या पुरवठ्यांच्या नावाखाली जगाशी थट्टा चालू आहे. युरोपियन देशांसह अनेक ठिकाणी चीनने अशी निकृष्ट पीपीई किट पाठविली आहेत, जी घालता येणार नाहीत. असे बरेच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत ज्यात चीनने पाठवलेल्या पीपीई किट्स परिधान करताच फाटल्या जात आहेत. चीननेही मदतीच्या मुखवटाच्या नावाखाली लज्जास्पद कृत्य केले आहे.  काही दिवसांपूर्वी चीनचा सर्वात जवळचा मित्र असलेल्या पाकिस्तानला चीनने अंडरवियरचे बनलेले मास्क पाठवले होते.  आता त्याने भारताशीही अशीच थट्टा केली आहे. तथापि, चीनने आपली गुणवत्ता वाढवण्यास आता सुरवात केली आहे.

आणखी वाचा - ऑनलाईन पिझ्झा ऑर्डर करताय? सावधान, ही बातमी वाचा!

भारतात रोज सुमारे 1 लाख पीपीई किट्सची गरज
सरकारी अधिकारी म्हणतात की ते फक्त सीई/एफडीए अधिकृत पीपीई खरेदी करीत आहेत. तथापि, शासनासही देणगी स्वरूपात अनेक पीपीई किट्स मिळाल्या आहेत, ज्या गुणवत्ता चाचणीमध्ये चांगल्या नसल्याचे आढळून आले आहे.. सूत्रांनी सांगितले की, "एफडीए/सीई द्वारा मान्यता नसलेल्या किट्सची भारतात गुणवत्ता चाचणी घ्यावी लागते." सुत्रांनी सांगितले की दर्जेदार चाचणीत नापास झालेल्या वस्तू भारत सरकारला देणगी म्हणून देण्यात आल्या होत्या. परंतु, त्यांनी या देणगीदारांच्या नावाशी संबंधित कोणतीही माहिती दिली नाही. भारताला दररोज सुमारे १ लाख पीपीई किट्सची आवश्यकता आहे.   जगभरातील वाढत्या मागणीमुळे इतक्या मोठ्या प्रमाणावर दररोज पीपीई किट्स उपलब्ध करणे हे आवाहनात्मक काम असल्याचे सांगण्यात येत आहे.

आणखी वाचा - राज्यात पावणे तीन लाख कोटींची उलाढाल ठप्प!

तीन देशांतून सर्वात जास्त पीपीई किट्स निर्यात
भारतात बहुतेक किट चीन, जपान आणि कोरिया येथून येतात. जपान आणि कोरियामधील किट बर्याुपैकी महाग आहेत. जगभरात कोरोना विषाणूचा खूप वेगाने प्रसार झाल्यामुळे युरोप आणि अमेरिकेने आता या किट्स निर्यातीसाठी बनविणे बंद केले आहे.

loading image
go to top