चीन पुन्हा चुकतंय; पाहा काय घडलंय चीनमध्ये!

पीटीआय
Thursday, 9 April 2020

चीनमध्ये कोरोनाचे रुग्ण पुन्हा आढळण्यास सुरुवात झाली आहे. दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधीनंतर लॉकडाउन उठविला असताना हे घडल्यामुळे चिंतेचे वतावरण निर्माण झाले आहे. बुधवारी दोन स्थानिक आणि परदेशातून आलेले ६१ चिनी नागरिक असे एकूण ६३ नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळं चीनमधील आरोग्य यंत्रणेच्या पायाखालची वाळू सरकलीय.

बीजिंग - चीनमध्ये कोरोनाचे रुग्ण पुन्हा आढळण्यास सुरुवात झाली आहे. दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधीनंतर लॉकडाउन उठविला असताना हे घडल्यामुळे चिंतेचे वतावरण निर्माण झाले आहे. बुधवारी दोन स्थानिक आणि परदेशातून आलेले ६१ चिनी नागरिक असे एकूण ६३ नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळं चीनमधील आरोग्य यंत्रणेच्या पायाखालची वाळू सरकलीय.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

चीनमध्ये सर्वाधिक 60 प्रयोग 
राष्ट्रीय आरोग्य आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, दोन रुग्ण मरण पावले असून, करोनाच्या बळींचा एकूण आकडा तीन हजार ३३५, तर रुग्णांचा आकडा ८१ हजार ८६५ इतका झाला. गेल्या काही दिवसापासून नवे रुग्ण आढळण्याचे प्रमाण वाढले नव्हते. स्थानिक रुग्ण तर सलग तीन दिवस सापडले नव्हते. आता नव्या रुग्णांची एकूण संख्या एक हजार १०४ इतकी झाली आहे. दरम्यान, कोरोनावरील अभ्यासात चीनने आघाडी घेतली असून लस संसोधनाचे प्रयत्न आणखी वेगाने केले जात आहेत. सर्वाधिक ६० शोध आणि प्रयोग चीनने केले आहेत. ब्रिटनच्या फिनबोल्ड या कंपनीने सर्वेक्षण केले. लस संशोधनाचे प्रयत्न ३९ देशांत सुरू आहेत. चीनपाठोपाठ अमेरिका ४९ प्रयोगांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. या कंपनीने कोरोना रुग्ण सापडलेल्या सर्व देशांतील शोध आणि वैद्यकीय अभ्यासाचा आढावा घेतला आहे. कोरोनामुळे बरीच जीवितहानी झालेला स्पेन मात्र संशोधनात बराच पिछाडीवर आहे.

Coronavirus : पाकिस्तानला तबलिगींचा मोठा फटका; २.५लाख लोक संपर्कात

काय घडतंय चीनमध्ये?

  • चीनमध्ये वुहान शहरातील संचारबंदी हटवण्यात आलीय 
  • राजधानी बीजिंग, शांघाय शहरातील संचारबंदी यापूर्वी उठवण्यात आली
  • बीजिंग, शांघाय शहरात पर्यटकांची झुंबड, सोशल डिस्टंसिंगचे तीन-तेरा
  • आणखी दोन कोरोना रुग्णांचा चीनमध्ये मृत्यू 
  • अजूनही चीनमध्ये ८१ हजार ८६५ कोरोना बाधित रुग्ण

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus china new 63 cases found after lockdown ends